भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारतीय संघाने तीन गडी गमावून 276 धावा केल्या आहेत. दरम्यान, मैदानावर इंग्लंडचे दोन फलंदाज डोमिनिक सिबली आणि हसीब हमीद यांनी असे काही केले की, मैदानावर बसलेल्या प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही.
झाले असे की, 59 व्या षटकात भारतीय कर्णधार विराट कोहलीने कव्हर्समध्ये सुंदर शॉट खेळला. त्यावेळी गोलंदाजीची जबाबदारी युवा अष्टपैलू सॅम करनच्या हातात होती. इंग्लंडचे दोन क्षेत्ररक्षक डोमिनिक सिबली आणि हसीब हमीद यांनी चेंडूच्या मागे धावत जाऊन चौकार अडवला.
सुरुवातीला चेंडू सिबलीच्या टप्प्यात होता आणि चेंडू सीमारेषेला लागण्यापूर्वी त्याने चेंडूला रोखण्यासाठी सुंदर डाईव्ह मारत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कौशल्या दाखवले होते. हमीदनेही चेंडू गाठला होता. पण, सिबलीसह चेंडू अडवण्यासाठी धावणाऱ्या हमीदला वाटले की, सिबली चेंडू अडवेल. म्हणून सिबलीशी टक्कर होऊ नये यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी त्याने सिबलीपासून थोडे दूर जाऊन डाईव्ह केला. त्याची ही कृती पाहून समालोचकांनाही हसू फुटले.
— The sports 360 (@Thesports3601) August 12, 2021
दरम्यान रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी संघाला चांगली सुरुवात दिली. भारताची पहिली विकेट 126 धावा झाल्या असताना पडली. यावेळी रोहित शर्मा 83 धावा करून तंबूत परतला होता. मात्र, दुसरा सलामीवीर केएल राहुलने चूक न करता शानदार शतकी खेळी साकारली. तो अजूनही खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. कर्णधार विराट कोहलीला चांगली सुरुवात मिळाली. पण तोही 42 धावा करून ओली रॉबिन्सनचा बळी ठरला. कोहलीची विकेट पडल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीस आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळी विरोधात असणाऱ्या ब्रेंडन मॅक्कलमचा ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूला मदतीचा हात; म्हणाला…
कारकिर्दीतील १२ वर्षे झोपेशी लढत राहिला ‘मास्टर ब्लास्टर’, पाहा शेवटी कसा मिळवला तोडगा?