नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या तीनही सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंड संघाला बॅकफुटवर टाकले आणि ३-० ने मालिका आपल्या नावावर केली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंड संघावर ७३ धावांनी मोठा विजय मिळवला. दरम्यान आपल्या पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या हर्षल पटेलच्या नावे दुसऱ्याच सामन्यात नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
प्रथम फलंदाजी करताना हर्षल पटेल ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. तो फलंदाजी करताना मोठे फटके खेळू शकतो, हे त्याने आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये दाखवून दिले आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्याने ११ चेंडूंमध्ये १ षटकार आणि २ चौकारांच्या साहाय्याने १८ धावांची खेळी केली. परंतु, १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने पॉइंटच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादात त्याची बॅट यष्टीला जाऊन धडकली आणि तो हिटविकेट होऊन माघारी परतला.
आगळ्यावेगळ्या प्रकारे बाद झाल्यामुळे समालोचकांना देखील आश्चर्य झाले होते. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा केएल राहुल नंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
पहिल्या सामन्यात मिळवला होता सामनावीर पुरस्कार
तिसऱ्या टी२० सामन्यात हर्षल पटेलने ११ चेंडूंमध्ये २ चौकार आणि १ षटकाराचा साहाय्याने १८ धावांची खेळी केली होती. हा त्याचा दुसराच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. तर रांचीमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी केली आणि २५ धावा खर्च करत २ गडी बाद केले होते. या अप्रतिम कामगिरीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
भारतीय संघाचा जोरदार विजय
तसेच तिसऱ्या टी२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली, तर ईशान किशनने २९ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १८४ धावा करण्यात यश आले होते.
https://twitter.com/CowCorner9/status/1462442915511238662?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1462442915511238662%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ind-vs-nz-3rd-harshal-patel-after-kl-rahul-became-2nd-indian-to-get-out-hit-wicket-in-t20is-watch-its-video-3860839.html
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या १७.२ षटकात १११ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली, तर टीम सेफर्टने १७ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ७३ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पसरले भीतीचे वातावरण! श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना झाली कोरोनाची लागण
न्यूझीलंडचा ३-० ने धुव्वा उडवण्यात ‘या’ ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची भूमिका