शनिवारी(19 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने पोर्ट एलिजाबेथ येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात नाबाद शतक झळकावले. याबरोबरच त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 शतके करण्याचाही विक्रम केला. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.
अमलाने या सामन्यात या 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 120 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने पदार्पण करणाऱ्या रसी वॅन डेर दसन बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारीही केली. रसीनेही 101 चेंडूत 93 धावांची खेळी केली होती. मात्र या दोघांनी धावांपेक्षाही अधिक चेंडू खेळले.
तसेच अमला नाबाद राहुनही या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 15 षटकात 106 धावा करता आल्या. त्यामुळे त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 266 धावा केल्या होत्या. 1992 च्या विश्वचषकापासून केवळ दोन विकेट गमावल्यानंतर आणि 50 षटके फलंदाजी केल्यानंतरची ही दक्षिण आफ्रिकेची निचांकी धावसंख्या आहे.
यामुळे दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्स यांनी अमला आणि रसी यांच्या फलंदाजी करतानाच्या दृष्टीकोनावर टिका केली आहे. त्याचबरोबर चाहत्यांनीही अमलाचे शतकी खेळीला स्वार्थी असल्याचे म्हटले आहे.
https://twitter.com/hershybru/status/1086648599990206465
https://twitter.com/hershybru/status/1086630033354047490
https://twitter.com/hershybru/status/1086626981863538688
South Africa totally deserves what they are getting here from Pakistan, who have been superb. Hashim Amla's selfish innings deserves nothing less than a big defeat.
— Saurabh Malhotra (@MalhotraSaurabh) January 19, 2019
Selfish amla 🤣🤣🤣 @amlahash pic.twitter.com/MOyKwfLOW5
— TradewithBiplab🔆 (@Fantasy11_Pro) January 19, 2019
https://twitter.com/BusiMaryMjacu/status/1086708726927712257
Selfish inng played by amla..min 30 runs short
— puneet kashyap (@preet_kashyap) January 19, 2019
266-2 at end of 50 Ovs won't be helpful in modern day cricket. What is the use of not losing wickets till then??
Can say Pakistan outplayed SA easily !!!
— Goutham (@thisis_Goutham_) January 19, 2019
https://twitter.com/Kg_Nino/status/1086698077677854722
मात्र असे असले तरी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीसने मधल्या काही षटकात पाकिस्तानचे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्याचे सांगत रेसी आणि अमला यांना पाठिंबा दिला आहे. तसेच तो म्हणाला की त्यांच्या संघाला फक्त 10-15 धावा कमी पडल्या.
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान समोर ठेवलेले 267 धावांचे आव्हान पाकिस्तानने इमाम-उल-हकच्या 86 आणि मोहम्मद हाफिजच्या नाबाद 71 धावांच्या जोरावर 49.1 षटकात सहज पार केले. यामुळे पाकिस्तानने या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
त्याचबरोबर पहिल्यांदाच आमलाचे प्रथम फलंदाजी करतानाचे शतक व्यर्थ गेले आहे. याआधी त्याने प्रथम फलंदाजी करताना 20 शतके केली असून त्या सगळ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी
–होय! धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक
–टीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर