भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी शमी व हसीन यांच्यातील वाद सोशल मिडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. वादांशी नेहमी जवळचे नाते असणाऱ्या हसीनने आता भारतीय संघाचे अभिनंदन करताना आपला पूर्वाश्रमीचा पती मोहम्मद शमी याच्यावर शेरेबाजी केली आहे.
मागील रविवारी आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचे अभिनंदन करणारी इंस्टाग्राम पोस्ट हसीन जहॉंने केली होती. या पोस्टमध्ये तिने भारतीय संघाचे अभिनंदन तसेच, भारताच्या विजयाचा नायक ठरलेल्या हार्दिक पंड्या याचे कौतुक केले होते. यासोबतच तिने आपला पूर्वाश्रमीचा पती मोहम्मद शमी याच्यावर देखील निशाणा साधला. तिने लिहिले,
“अभिनंदन. महान विजय… देशाला विजय मिळवून दिल्याबद्दल आपल्या वाघांचे खूप खूप आभार. हे व्हायला हवे होते. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, इमानदार, देशभक्तांपासून वाचते, गुन्हेगार आणि महिलांच्या मागे लागणाऱ्यांमूळे नाही.”
https://www.instagram.com/p/Ch0xAwXPvzC/?igshid=YmMyMTA2M2Y=
तिच्या या वक्तव्यावर अनेक भारतीय चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. शमी हादेखील भारताचा अनेक वेळा मॅचविनर राहिल्याची आठवण अनेकांनी तिला करून दिली. तसेच हसीन केवळ प्रसिद्धीसाठी अशा पोस्ट करत असल्याचे देखील काहींनी म्हटले.
हसीन जहॉं आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. २०१८ मध्ये दोघांमध्ये वाद झालेला. हसीन जहाँने शमी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. शमी आणि हसीन यांनी २०१४ मध्ये लग्न झाले होते. २०१८ मधील वादानंतर तिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. हसीन सातत्याने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अल्टीमेट खो खो लीगच्या पहिल्या मौसमसाठी एकूण 2कोटी पारितोषिक रक्कम जाहीर; प्ले ऑफ सामन्यांना शुक्रवारी प्रारंभ
धवनसाठी मुलगी शोधा! नवीन व्हिडिओ व्हायरल, भारताचा सलामीवीर करणार का दुसरे लग्न?
‘भारताचा सामना पाहण्यासाठी येऊ नकोस’, BAN vs AFG सामन्यात दिसलेल्या सुंदरीची सुरुये सर्वत्र चर्चा