आशिया चषक 2022 चार अंतिम सामना दुबई येथे खेळला गेला. युवा श्रीलंका संघाने तगड्या पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत करत सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला. एक वेळ पाकिस्तानच्या बाजूने चाललेला हा सामना श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाने पलटवला. सतराव्या षटकात त्याने तीन बळी मिळवत पाकिस्तानचा डाव नेस्तनाबूत केला.
W 1 W 1 W 0 🤯
Wanindu Hasaranga with a magical over 💫#AsiaCup2022 | Scorecard: https://t.co/xA1vz7dqLy pic.twitter.com/zcE0OSNVFW
— ICC (@ICC) September 11, 2022
पाकिस्तान मोहम्मद रिझवानच्या खेळीने विजयाकडे चालला असताना 17 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हसरंगाने अर्धशतक करून खेळत असलेल्या रिजवानला पहिल्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानचा फिनिशर आसिफ अली याचा त्रिफळा उडवला. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर दुसरा आक्रमक फलंदाज खुशदिल शहा याला बाद करत सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या बाजूने झुकवला. हसरंगाने सुरुवातीला फलंदाजीतही तितकेच महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याने 21 चेंडूवर 36 धावांची आक्रमक खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 Final: पाकिस्तानने टॉस जिंकून अर्धा सामना घातला खिशात! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
“विलियम्सनला कर्णधार म्हणून हटविण्याची वेळ आली”; न्यूझीलंडच्याच दिग्गजाने व्यक्त केले रोखठोक मत