इंग्लंड संघाचा महान माजी कर्णधार सर एलिस्टर कूकने लाराच्या जवळपास पोहचणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश केला आहे. सध्याचा काळात लाराशी बरोबरी करु शकतो असा विराट कोहली एकमेव खेळाडू असल्याचे त्याने सांगितले आहे.
कूक सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा, रिकी पाॅटींग, राहुल द्रविड, कुमार संगकारा व जॅक कॅलिससारख्या महान खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळला आहे. यातील ब्रायन लारा त्याला सर्वात उजवा वाटतो.
कूकच्या मते, जॅक कॅलिस, रिकी पाॅटींग व कुमार संगकारा हे खेळाडू लाराच्या आसपास पोहचले. “तुम्ही आता या खेळाडूंमध्ये विराटचेही नाव घेऊ शकता, कारण विराटकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मुक्तहस्ते धावा करण्याची क्षमता आहे,” असे यावेळी कूक म्हणाला.
कूकने इंग्लंडकडून कसोटीत सर्वोच्च धावा केल्या असून १६१ कसोटी सामन्यात त्याने १२४७२ धावा त्याने केल्या आहेत.