---Advertisement---

धोनी आणि चाहत्याच्या त्या पकडापकडीच्या खेळामुळे वाद

---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे अनेकदा काही चाहते धोनीला भेटण्यासाठी सुरक्षा भेदत मैदानात येतात. अशीच घटना 5 मार्चला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पहायला मिळाली.

या सामन्यात क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाच्या दिशेने धोनीचा एक चाहता अचानक पळत आला. पण त्याचवेळी धोनीनेही त्याच्या गमतीशीर स्वभावाचे दर्शन दिले. त्यावेळी धोनी संघसहकाऱ्यांच्या अवतीभवती पळत होता. त्यामुळे तो चाहताही धोनीच्या मागे पळत होता. अखेर खेळपट्टीच्या जवळ आल्यावर धोनी थांबला आणि त्या चाहत्याला भेटला.

या घटनेची मागील दोन दिवस मोठ्याप्रमाणात चर्चा झाली. तसेच या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

पण या घटनेवर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते सुनील गावसकरांना म्हणाले, ‘सुरक्षा कुठे आहे, सुनील?’

यावर भारताचे दिग्गज माजी फलंदाज गावसकरांनी मजेशीर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘ते(सुरक्षारक्षक) सामना पाहत आहेत. त्यामुळे ते हा अडथळा थांबवू शकत नाही. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये सुरक्षारक्षक मैदानाकडे पाठ करुन बसतात आणि प्रेक्षकांना पाहतात.’

या सामन्यात भारताने 8 धावांनी विजय मिळवला असून 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना रांची येथे 8 मार्चला होणार आहे.

https://twitter.com/sumesh75993202/status/1103611186141028352

महत्त्वाच्या बातम्या –

अजिंक्य रहाणेच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी

‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी आता झळकणार वेबसिरीजमध्ये…

त्या निर्णयामुळे सामन्याला मिळाली कलाटणी, कर्णधार कोहलीने केला खूलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment