भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 209 धावांचा यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात भारताने यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक याला पसंती दिली होती. त्यामुळे रिषभ पंत याला बाकावर बसावे लागले. भारतीय संघाने पंतला संधी न दिल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर व समालोचक मॅथ्यू हेडनने भारतीय संघाच्या रणनीती विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत, रिषभ पंतची पाठराखण केली आहे.
प्रसारण वाहिनीसाठी समालोचन करताना हेडन म्हणाला,
“रिषभ पंतला पाठिंबा देण्याची गरज असून, तो संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे. तो म्हणाला, ‘मी निवडकर्ता असतो तर पंत माझ्या प्रत्येक संघात असता. त्याला आणखी पाठिंबा हवा आहे. तो फॉर्म मध्ये असो किंवा नसो, मला वाटते की त्याला संघात स्थान मिळाले पाहिजे. तो सर्वच बाबतीत उत्कृष्ट खेळाडू आहे.”
आशिया चषक स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्येही पंतला स्थान देण्यात आले नव्हते. तो सुपर 4 फेरीत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला. त्यानंतर आता कार्तिकला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी दिली गेली. मात्र पहिल्या सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. त्याने 5 चेंडूत केवळ सहा धावा केल्या आणि नॅथन एलिसच्या चेंडूवर तो बाद झाला.
त्याचवेळी भारताचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी पंत आणि कार्तिक या दोघांनाही भारतीय संघात जागा बनवली गेली पाहिजे असे म्हटले. हार्दिक पंड्याचा रूपात गोलंदाजी पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय संघ अशी जोखीम घेऊ शकतो असे त्यांनी म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना
तीन सामन्यांतील 18 चेंडूत भुवनेश्वरने खर्च केल्यात 49 धावा, माजी दिग्गजाने खूपच सुनावले
तुफान व्हायरल होतेय रोहितची ही’ रिऍक्शन; मात्र नक्की काय घडलेले त्यावेळी?