सध्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ व वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्या दरम्यान टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना सिडनी येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची कर्णधार हायली मॅथ्यूज हिने वादळी शतक झळकावत महिला टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला.
WHAT A MATCH 🤯
Hayley Matthews leads West Indies to the highest successful run chase in Women's T20Is 🔥#AUSvWI | 📝: #AUSvWI: https://t.co/0wYawUOrHc pic.twitter.com/rO3oH1EpS4
— ICC (@ICC) October 2, 2023
सिडनी येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने तुफानी फटकेबाजी करताना 212 धावा उभारल्या. अनुभवी एलिस पेरीने 46 चेंडूत 70 धावा केल्या. यानंतर लिचफिल्ड हिने केवळ 19 चेंडूमध्ये 52 व वॅरहेमने 13 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. केवळ 11 धावांवर त्यांच्या दोन फलंदाज बाद झाल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार हायली मॅथ्यूज व अनुभवी स्टेफनी टेलर यांनी संघाचा डाव हातात घेतला. मॅथ्यूजने केवळ 64 चेंडूंमध्ये 132 धावांची स्फोटक खेळी केली. यामध्ये 20 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. टेलरने 41 चेंडूवर 59 धावा केल्या. हा महिला टी20 क्रिकेटमधील धावांचा पाठलाग करताना मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे.
Hayley Matthews leads West Indies to the highest successful run chase in Women’s T20Is
हेही वाचा-
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान
‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून