---Advertisement---

भारीच! आयसीसीने ‘त्या’ कुत्र्याला दिला खास ‘डॉग ऑफ द मंथ’ पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 5:09 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर महिन्यात सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार दिला जातो. मात्र, यंदा आयसीसीने ‘डॅझल’ नावाच्या एका कुत्र्यासाठी खास ‘आयसीसी डॉग ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर केला आहे. हा विशेष पुरस्कार असल्याचेही आयसीसीने जाहीर केले.

‘डॅझल’ नक्की आहे तरी कोण? 
शनिवारी (११ सप्टेंबर) आयर्लंड महिला टी-२० चषक स्पर्धेतील एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. या व्हिडिओमध्ये दिसते सामना सुरु असतानाच ‘डॅझल’ नावाचा कुत्रा मैदानात घुसला आणि तो चक्क चेंडू तोंडात धरुन मैदानात पळू लागला.

झाले असे की ब्रीडी क्रिकेट क्लब आणि सिव्हील सर्व्हिस नॉर्थ या दोन्ही संघांमधील उपांत्यफेरीच्या सामन्यात सिव्हिल सर्व्हिस संघाची फलंदाजी सुरू असताना ९ व्या षटकात फलंदाजाने थर्डमॅनच्या दिशेने कट शॉट खेळला. त्यावेळी क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलून यष्टिरक्षकाकडे फेकला. यष्टिरक्षकाने तो चेंडू फलंदाजाला बाद करण्यासाठी स्टंपला मारला. परंतु, तो चेंडू स्टंपला लागला नाही.

इतक्यात मैदानात कुत्र्याने प्रवेश केला आणि तो चेंडू आपल्या तोंडात धरून मैदानात धावू लागला. त्यावेळी क्षेत्ररक्षक त्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत होते. अखेर फलंदाजाने त्या कुत्र्याला पकडल्यानंतर चेंडू घेण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

आयसीसीकडून खास पुरस्कार
या मजेशीर घटनेकडे पाहून आयसीसीनेही ‘डॅझल’साठी खास पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी डॅझलला ‘आयसीसी डॉग ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘आपल्याकडे यंदा प्लेअर ऑफ द मंथचा अतिरिक्त विजेता आहे’.

आयसीसीने डॅझलचा मैदानात घुसून चेंडू पळवतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओला आयसीसीने कॅप्शन दिले की ‘मैदानात अपवादात्मक चपळता’. आयसीसीच्या या खास पोस्टवरही चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

जो रुट, रिचर्ड्सन पुरस्काराचे विजेते 
आयसीसीचा ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटला, तर सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार आर्यलंडच्या इमियर रिचर्डसन हिला जाहीर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

जो रुट ठरला बुमराह, आफ्रिदीला भारी; जिंकला ऑगस्ट महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार

पत्नीच पतीचं पाठबळ!! खराब फॉर्मशी झगडत असताना धनश्रीने ‘असा’ वाढवला चहलचा आत्मविश्वास

शास्त्रींचा पुस्तक प्रकाशन सोहळा की आयपीएल? अंतिम कसोटी रद्द होण्यामागील खऱ्या कारणाचा गांगुलीकडून खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---