आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची घोषणा होऊन अनेक दिवस उलटले तरी त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. काहींना करुण नायरची चिंता आहे. तर काहींना संजू सॅमसन आणि मोहम्मद सिराज संघात नसल्याबद्दल चिंता आहे. तर काहींना सूर्यकुमार यादवला संघात न घेतल्याबद्दल नाराजी आहे. या दरम्यान, युझवेंद्र चहलबाबत एक विधान समोर आले आहे. ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने म्हटले आहे की बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने चहलची कारकीर्द उद्ध्वस्त केली आहे.
दोन वर्षांपूर्वी संघातून वगळण्यापूर्वी युझवेंद्र चहलचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड असतानाही त्याची कारकीर्द कोणत्याही कारणाशिवाय संपुष्टात आली असे आकाश चोप्राने म्हणले आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने भारताच्या एकदिवसीय संघाबद्दल सांगितले की युझवेंद्र चहलला वाईट कामगिरी न करताही त्याला वगळण्यात आले.
माजी क्रिकेटपटू म्हणाला, “युझवेंद्र चहलचं कारकिर्द पूर्णपणे संपले आहे. त्याची फाईल बंद करण्यात आली आहे. त्यांनी (संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय) असे का केले हे मला माहित नाही? हे एक मनोरंजक प्रकरण आहे. तो शेवटचा जानेवारी 2023 मध्ये खेळला होता. यानंतर दोन वर्षांपासून तो संघाबहेर आहे. त्याची आकडेवारीही खूप चांगली आहे. त्याने खूप विकेट्स घेतल्या आहेत आणि तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.” पण त्याला संघाबाहेर करण्याचे कारण अद्याप कळाले नाही.
72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेणारा चहल ऑगस्ट 2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. हा फिरकी गोलंदाज विजय हजारे ट्रॉफीमध्ये ही दिसला नाही. यामागील कारण त्याच्या आयुष्यात अशांतता असणे हे देखील असू शकते. अशा परिस्थितीत पुढे बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, जर तुम्ही दोन वर्षे संघाबाहेर असाल तर तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दावेदारांमध्ये नाही चहलची फाईल दोन वर्षांपासून बंद असल्याने, युझीसाठी आता संघाता जागा नाही.
हेही वाचा-
IND vs ENG; 2 वर्षे 2 महिन्यांची प्रतिक्षा संपणार, कोलकातामध्ये हा खेळाडू कमबॅक करणार
‘खऱ्या प्रेमावरचा विश्वास…,’ पत्नी धनश्रीसोबत घटस्फोटाच्या अफवांदरम्यान चहलची खळबळजनक पोस्ट
एबी डिव्हिलियर्स पुन्हा एकदा त्याची जादू दाखवणार! दिला कमबॅकचा इशारा