मुंबई । तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम डोकेदुखी ठरला आहे. पहिल्यांदा संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे अचानक भारतात परतला, तर त्यानंतर टीमच्या 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाली. वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि फलंदाज ऋतुराज गायकवाड या 13 सदस्यांमध्ये सामील होते. आता दोन्ही खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सोबतच ते प्रशिक्षणातही सामील झाले. मात्र, सुरेश रैनाच्या जागी संघाने कोणाचाही संघात समावेश केलेला नाही.
चेन्नई संघात रैना हा तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याच्या अनुपस्थितीत संघाला प्रतिभावान फलंदाजाची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसनने सांगितले की, रैनाची जागा भरून काढणे संघाला सोपे जाणार नाही.
तो म्हणाला, ”रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितीमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागेल. सीएसकेची चांगली गोष्ट म्हणजे संघातील फलंदाजी फळी मजबूत आहे. रैनाच्या ऐवजी दुसर्याला त्याची जागा देणे सोपे होणार नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे, तर त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत. रैनाची जागी भरण्याचा प्रश्न आला असेल, तर भारतीय कसोटी फलंदाज मुरली विजयच संघासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकेल.”
“अर्थात रैनाची अनुपस्थिती ही एक मोठी हानी आहे, पण आमच्याकडे गन प्लेयर मुरली विजय आहे. त्याला काही काळ टी20 खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु तो एक उत्तम फलंदाज आहे. मागील वर्षी बहुतेक वेळा तो बेंचवर बसून होता. परंतु आता त्याला अधिक संधी मिळतील,” असेही शेन वॉटसनने सांगितले.
अनुभवी अष्टपैलू शेन वॉटसनचा असा विश्वास आहे की, कोव्हिड -१९ च्या 13 प्रकरणांमुळे तयारीत अडथळे आले. तरीही चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या अनुभवी व सक्षम खेळाडूंच्या जोरावर आगामी आयपीएल हंगाम जिंकण्यात यशस्वी होईल.
19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या काही आठवड्यांपूर्वी चेन्नई संघातील 13 सदस्यांना या प्राणघातक आजाराची लागण झाली होती. यामुळे, त्यांच्या संघाला बराच काळ वेगळे ठेवावे लागले आणि नंतर त्यांनी हा सराव सुरू केला. नबिल हाश्मीच्या यूट्यूब कार्यक्रमामध्ये बोलताना वॉटसन म्हणाला होता की, “एक अनुभवी संघ असण्याचा अर्थ असा आहे की, पहिल्या सामन्यापासूनच आपल्या खेळाडूंना दबाव परिस्थितीत त्यांचे कौशल्य दाखवण्याची चांगली समज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले केकेआरच्या फिरकीपटूचे कौतुक म्हणतो, ‘त्याला खूप आत्मविश्वास आहे’
-डरना मना है! ‘आयपीएलमध्ये खेळणारे क्रिकेटर्स नाही घाबरणार कोरोना व्हायरसला’
ट्रेंडिंग लेख-
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा