---Advertisement---

सुरेश रैनाने केला एमएस धोनीबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला…

---Advertisement---

आयपीएल 2020 चा हंगाम (IPL2020 Season) जवळ आला आहे. हा आयपीएलचा 13 वा हंगाम (IPL 13th Season) असणार आहे. या हंगामातील पहिला सामना 29 मार्चपासून सुरू होणार आहे. परंतु त्यापूर्वी चेन्नई सुपर किंंग्सचा (Chennai Super Kings) अनुभवी खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) एमएस धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल 2020च्या प्रशिक्षण (Training) योजनांबद्दल खुलासा केला आहे.

रैनाने दीर्घकाळानंतर संघसहकारी अंबाती रायडूबरोबर चेन्नई सुपर किंग्सच्या शिबिरात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्याने धोनीच्या प्रशिक्षणाबद्दल बोलताना सांगितले की, “यावर्षी धोनी आपल्या प्रशिक्षणाची सुरुवात चेन्नई येथे मार्चच्या पहिल्या आठवड्यात करेल.”

आयपीएलपूर्वी प्रशिक्षणासाठी धोनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात चेन्नईला येणार आहे. त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना पाहुन खूप चांगले वाटले,” असे रैनाने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

“जर धोनीला क्रिकेट सोडायचे असेल तर तो कसलीही मोठी चर्चा न होऊ देता सोडेल,” असेही यावेळी रैनाने स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---