कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे भारतीय संघाने फेब्रुवारी 2020 नंतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, सात महिन्यांच्या दीर्घ काळानंतर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरेने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरचे कौतुक केले आहे.
दबावाखाली अय्यर करतो चांगली कामगिरी
“अय्यर अशा दुर्मिळ क्रिकेटपटूंपैकी एक आहे, जो दबावाखाली चांगली कामगिरी करतो. जेव्हा जबाबदारी असते, तेव्हा तो उत्कृष्ट प्रदर्शन करतो. आपण जितकी जास्त त्याच्याकडून अपेक्षा करतो तो तितकाच चांगला खेळतो. सन 2018 मध्ये त्याने हे सिद्ध केलं होतं. त्या वर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी या 23 वर्षीय फलंदाजावर देण्यात आली होती,” असेही पुढे बोलताना कॅरे म्हणाला.
अय्यर भविष्यात बनेल उत्तम कर्णधार
श्रेयस अय्यरच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक करताना कॅरे म्हणाला की, “श्रेयस अय्यरमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, यात काहीच शंका नाही. मला वाटतं तो भविष्यात एक उत्तम कर्णधार बनेल.”
मी आयपीएलच्या मागील काही हंगामापासून यशस्वी- कॅरे
“संघातील सर्व खेळाडूंशी संपर्क साधण्याची त्याची क्षमता अप्रतिम होती. त्याने स्वत: कडे दुर्लक्ष केले कारण त्याला संघाबद्दल अधिक चिंता वाटली. गेल्या काही हंगामापासून दिल्लीकडून खेळताना तो खरोखर यशस्वी ठरला,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
आयपीएलमध्ये केली उत्कृष्ट कामगिरी
सन 2018 च्या हंगामात दिल्ली संघ गुणतालिकेत तळाशी होता. मात्र, अय्यरने त्या हंगामात 411 धावा केल्या होत्या. सन 2019 मध्ये अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने सात वर्षानंतर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले. त्याने त्या हंगामात 463 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या 13 व्या हंगामात दिल्लीचा अंतिम सामन्यात पराभव झाला. पण अय्यरने धडाकेबाज कामगिरी करत या हंगामात 519 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई विरुद्ध ‘ही’ रणनीती वापरणार दिल्लीचा संघ, कर्णधार श्रेयस अय्यरचा खुलासा
Video – श्रेयस अय्यर विसरला आपल्याच संघातील खेळाडूचे नाव, वॉर्नरने करुन दिली आठवण
श्रेयस अय्यरने ‘या’ दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
चर्चा तर होणारंच! विराट कोहलीला ट्रोल करणारं ट्वीट सूर्यकुमार यादवकडून लाईक
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…