आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारताचा संघ सोमवारी (12 सप्टेंबर) जाहीर झाला. रोहित शर्मा या आठव्या टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. तर उपकर्णधार म्हणून केएल राहुल संघात सामील आहे. संघामध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा देखील समावेश आहे. 15 जणांच्या या यादीत एक नाव असे आहे ज्याचा कोणीही विचार केला नाही. या खेळाडूने त्याच्या अप्रतिम कामगिरीने निवडकर्त्यांना संघात घेण्यात भाग पाडले आहे.
यावर्षी भारतीय क्रिकेटमध्ये एक विलक्षण घटना घडली ती म्हणजे दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याचे भारतीय संघात झालेले जबरदस्त पुनरागमन. त्याला आता ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठीच्या संघात निवडले गेले आहे. कार्तिकने 2004मध्ये भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्यानंतर तो सतत आत-बाहेर होत राहिला.
कार्तिकने 2006मध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 31 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. नंतर तो संघात दिसेनासा झाला होता. त्याच्या बाबतीत होत असलेला अन्याय पाहून चाहतेही तो आता संघाबाहेरच राहणार असे म्हणत होते. अशा परिस्थितीतही त्याने हार न मानता आपली कामगिरी उंचावली. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना फिनिशर आणि विकेटकिपरची चांगली भुमिका पार पाडली.
तमिळनाडूच्या या विकेटकीपर-फलंदाजाने आयपीएल 2022 गाजवली आहे. त्याने 14 सामन्यांत 57.40च्या सरासरीने 284 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 191.33 असा राहिला. त्याच्या या कामगिमुळे तो आता भारतीय संघाचा नियमित सभासद झाला आहे. त्याला निवडकर्त्यांनी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेसाठी संघात घेतले होते. त्याचबरोबर आयर्लंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दौऱ्यात झालेल्या टी20 मालिकांमध्येही तो संघाचा भाग राहिला. तसेच त्याने आशिया चषक 2022च्या स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत.
कार्तिकने आतापर्यंत 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यातील 18 सामने त्याने याचवर्षी खेळले आहेत. यावरूनच त्याने संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली याचा अंदाज लावणे कठीण आहे. कारण 2006 ते 2022 हा मोठा कालखंड आहे. त्याच्या सोबतीला असणाऱ्या अनेकांनी आता निवृत्ती घेतली आहे. मात्र तो अजूनही संघात असून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तसेच 2018 मध्ये झालेल्या निदहास ट्रॉफीचा अंतिम सामना चाहत्यांच्या कायम लक्षात राहिल. त्या सामन्यात कार्तिकने शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार मारला होता.
The DK Stunner! ????@DineshKarthik's 8-ball 29*, including a last-ball six, helps India ???????? to a four-wicket win against Bangladesh ???????? in a thrilling #NidahasTrophy final.
Did you see that coming!? #IndvBan REPORT ????https://t.co/DeluM6p7By pic.twitter.com/ycJKtqi2vd
— ICC (@ICC) March 18, 2018
टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायच्या आहेत. या दोन्ही मालिकांमध्येही कार्तिक भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. त्याने पहिला टी20 विश्वचषकदेखील खेळला असून त्याचा 2010च्या टी20 विश्वचषक संघातही समावेश होता. तर ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2022चे सामने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळले जाणार आहेत.
टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलाला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीड वर्षांपूर्वी नैराश्यात गेलेला दीपक आता वर्ल्डकपला निघालाय
यावर्षीचा टी-20 विश्वचषक युझवेंद्र चहल खेळणारच! बीसीसीआयने जाहीर केला संघ
पुन्हा एकदा बजबॉल ठरले यशस्वी! तीन दिवसांत इंग्लंडने आफ्रिकेला पराभूत करत मालिका टाकली खिशात






