सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्य़ूझीलंडने वर्चस्व गाजवत 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. पण आता दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी न्यूझीलंडसाठी मास्टर प्लॅन बनवला आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकाने पहिल्या कसोटीत पडलेल्या भारतीय संघाच्या विकेट्स पाहिल्या. सरावाच्या वेळी तो लॅपटॉपसोबत दिसला. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडची शॉर्ट पिच गोलंदाजी भारतीय संघावर वर्चस्व ठरल्याची त्यांनी स्पष्ट केले. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) आणि इतर फलंदाज ज्याप्रकारे बाद झाले, त्याकडे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बारकाईने लक्ष दिले.
गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सांगितले की, फलंदाज शरीराच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी काही शॉट्स वापरतील. त्यामुळे धावा होत राहतील. याशिवाय खेळपट्टीचा मूड पाहून प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय घेतला जाईल. याशिवाय दुसऱ्या कसोटीपूर्वी गंभीरने शुबमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना तंदुरुस्त आहत म्हणून घोषित केले आहे.
हेही वाचा-
झिम्बाब्वेने रचला इतिहास! बनला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ
WTC मध्ये सर्वाधिक वेळा सिंगल डिजिटमध्ये बाद होणारे भारतीय फलंदाज
IND VS NZ; या खास खेळाडूचे तीन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन, रोहित शर्माचा मास्टर प्लॅन?