टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी मीडियाच्या अनेक कठीण प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र दोघेही वनडे संघात परतले आहेत.
या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर विराट कोहलीसोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलला. गंभीर म्हणाला की, “आमच्यात काय संभाषण झालं हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही भारताचं प्रतिनिधित्व करू आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी एकत्र काम करू.”
विराट कोहलीसोबतचं नातं कसं आहे? यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला, ‘टीआरपीसाठी हे चांगलं आहे. परंतु माझं त्याच्याशी असलेलं नातं सार्वजनिक नाही. विराटशी माझं नातं दोन मॅच्युअर लोकांमधील नातं आहे. मैदानावरील प्रत्येक खेळाडूला त्याच्या जर्सीसाठी लढण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक खेळाडूला जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतायचं आहे. पण सध्या आम्ही दोघंही भारताचं प्रतिनिधित्व करत आहोत. 140 कोटी देशवासीयांचं प्रतिनिधित्व करत आहोत. मला वाटतं की आम्ही दोघं एकत्र विचार करू आणि भारताचा अभिमान वाढवू. मैदानाबाहेर माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत आणि मी ते पुढेही कायम ठेवीन”.
गंभीर पुढे म्हणाला, “मी त्याच्याशी (विराटशी) अनेक मुद्द्यांवर बोललो आहे. मी मेसेजही केला आहे. हे महत्त्वाचं नाही की आमच्यात काय संभाषण झालं, किंवा मी त्याच्याशी किती वेळा बोललो. मी मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी, किवा बनल्यानंतर आणि मॅच दरम्यान, फक्त आम्हाला हेडलाइन्स हव्या….हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आम्ही दोघे मिळून भारताला अभिमान वाटावा यासाठी कठोर परिश्रम करणार आहोत आणि हे आमचं कामच आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”
‘सुर्यकुमारलाच कर्णधार का बनवले?’, आगरकर म्हणाला; हार्दिकचा एक प्रॅाब्लेम आहे….
‘ऋतुराज गायकवाडला का वगळले?’, आगरकर म्हणतोय; आम्ही…..