---Advertisement---

नवा प्रवास, नवे ध्येय; भारताचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर शास्त्री ‘या’ आयपीएल फ्रँचायजीला देणार कोचिंग!!

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 2:16 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हे सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. सर्वत्र अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे की, रवी शास्त्रींनंतर राहुल द्रविड हे पद स्वीकारू शकतात. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. दरम्यान रवी शास्त्री आता नवीन प्रवास सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत.

या संघाला देऊ शकतात प्रशिक्षण
रवी शास्त्रींच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीत म्हटले की, “जे काही होईल तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते आता आयपीएल फ्रँचायजीसाठी देखील काम करण्यास तयार आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी भरपूर यात्रा केली आहे, ज्यामुळे त्यांना आता यात्रा टाळायला आवडेल. आयपीएल स्पर्धा नुकताच संपन्न झाली आहे. तर विराट कोहली आणि रवी शास्त्री हे टी-२० विश्वचषक स्पर्धेत व्यस्त आहेत. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. परंतु ते आयपीएल २०२२ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला प्रशिक्षण देताना दिसून येऊ शकतात.”

समालोचकाची पार पाडू शकतात भूमिका
माध्यमातील वृत्तांनुसार, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसह आणखी काही फ्रँचायजी देखील रवी शास्त्रींच्या संपर्कात आहेत. तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेत आणखी २ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे ते कुठल्याही संघाला प्रशिक्षण देऊ शकतात. तसेच असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे की, त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते समालोचकाची भूमिका पार पाडू शकतात. यापूर्वी देखील त्यांनी समालोचकाची भूमिका पार पाडली आहे.

अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले होते.रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघाने २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये जाऊन देखील अप्रतिम कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक

‘बाबा, यापूर्वी तुम्हाला असं कधीच पाहिलं नाही’, अश्विनला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित

टी२० विश्वचषक २०२१: भारत आणि पाकिस्तान संघांची ‘सार्वकालिन प्लेइंग इलेव्हन’, धोनी संघनायक तर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---