भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रविवारी (१२ जून) कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या मालिकेसाठी संघासोबत उपस्थित आहेत, पण रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्याच्या आधी त्यांनी थोडा वेळ काढला आणि माजी दिग्गज बिशन सिंग बेदी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा पहिला टी-२० सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असेल. याच पार्श्वभूमीवर संघातील खेळाडू दुसऱ्या सामन्यापूर्वी कसून मेहनत करताना दिसले. प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) खेळाडूंना विशेष मार्गदर्शन करताना दिसले.
खेळाडूंना द्रविडचे आवश्यक मार्गदर्शन मिळाले, पण यातून देखील त्यांनी वेळ काढला आणि भारताच्या माजी फिरकी गोलंदाजांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी पोहोचले. बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) हे त्यांच्या काळातील भारतीय संघाचे एक महान फिरकी गोलंदाज होते. त्यांनी अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि विजय देखील मिळवून दिला आहे. बिशन सिंग सध्या ७५ वर्षांचे आहेत. द्रिवड आणि बिशन सिंग यांचा सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे.
https://www.instagram.com/p/CesXndZI28b/
बिशन सिंग बेदी यांची कारकीर्द
दरम्यान, बिशन सिंग बेदींच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांनी १९६६ ते १९७९ यादरम्यानच्या काळात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी एकूण ६७ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये २६६ विकेट्स घेतल्या होत्या. यापैकी २२ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली.
दरम्यान, भारतीय संघाला १ जुलै रोजी इंग्लंडविरुद्धचा एकमांत्र कसोटी सामना खेळायचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल द्रविड सहभाग घेणार नसल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती, पण नंतर द्रविडने स्वतः इच्छा दाखवल्यामुळे ते आफ्रिकेविरुद्ध भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले. द्रविडच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका संभाळणार होता, पण असे झाले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! द्रविडने फोडलेला प्रेक्षकाच्या हातातला ग्लास, पाहा व्हिडिओ
INDvsSA । ‘या’ ६ खेळाडूंची कामगिरी दुसऱ्या टी२० सामन्यात ठरणार निर्णायक, टाका एक नजर
काव्या मारन ते प्रीती झिंटा, ‘या’ आहेत ग्लॅमरचा तडका लावणाऱ्या आयपीएल संघांच्या मालकीणबाई