यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात आयसीसी महिला विश्वचषक (icc womens world cup 2022) खेळला जाणार आहे. ही विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वी भारताचा महिला संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी, भारतीय महिला संघाच्या अनुभवी खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज (jemima rodrigues) आणि शिखा पांडे (shikha pandey) यांना विश्वचषक संघातून वगळले गेले आहे. यानंतर अनेकांनी त्यांना संघात सामील न करण्याविषयी प्रश्न उपस्थित केले होते. आता महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार (ramesh powar) यांनी याविषयी सविस्तर उत्तर दिले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ लवकरच न्यूझीलंडला रवाना होणार आहे. त्यापूर्वी महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज (mithali raj) आणि प्रशिक्षक रमेश पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रशिक्षकांनी शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्ज आणि पूनम राऊत यांना विश्वचषक संघात संधी न मिळण्याचे कारण सांगितले.
पवार म्हणाले की, “आमच्या योजनेत सामील असलेल्या प्रत्येक खेळाडूला स्वतःविषयी माहिती आहे. आम्हाला त्यांच्याशी वेगळा संवाद साधण्याची गरज नाही. कारण, संघनिवड करताना पाच निवडकर्ता, कर्णधार आणि प्रशिक्षकांना निर्णय घ्यायचा असतो. त्यांनी सर्व खेळाडूंच्या नावांवर चर्चा केली आहे आणि त्या १८ खेळाडूंना निवडले ज्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत आणि विश्वचषकात चांगले खेळू शकतात.”
वेगवान गोलंदाज मेघना सिंग आणि रेणुका सिंग तसेच फलंदाज यास्तिका भाटिया यांनी ऑस्ट्रेलियामध्ये चांगले प्रदर्शन केले होते. त्याचा फायदा त्यांना मिळाला आणि विश्वचषक संघात त्यांची निवड करण्यात आली. पोवार पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्ही सर्वांनाच निवडू शकत नाही. केवळ १५ खेळाडू आणि तीन राखीव ठेऊ शकता. आम्ही रेणुका, मेघना ् यांसारख्या वेगवान गोलंदाजांमध्ये काही खास पाहत आहोत. त्या चांगले प्रदर्शन करत आहेत. जर त्या चांगले प्रदर्शन करत राहिल्या, तर त्यांना आगामी सामन्यांमध्ये संधी मिळू शकते.”
“फलंदाजीमध्ये यास्तिका, स्मृती आणि मिताली सतत चांगले प्रदर्शन करत आल्या आहेत. त्यामुळे आम्ही जास्त बदल केले नाहीत. ज्या संघात नाहीत, त्यांना माहिती आहे की, त्या का नाहीत.” असे पोवार पुढे बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेचा भारताला ‘व्हाईटवॉश’! दीपक चहरची झुंजार खेळी व्यर्थ
टीम इंडियासाठी ‘विलन’ ठरतोय रिषभ! यष्टिरक्षणातील चुकांची मोजावी लागतेय संघाला किंमत
कॅप्टन केएलचा ‘रॉकेट थ्रो’ आणि बवुमा तंबूत; पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहा –