---Advertisement---

रवी शास्त्रींचे संकेत; आर अश्विनच्या जागी या खेळाडूला मिळणार संधी…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 8:07 PM
---Advertisement---

शनिवारपासून (29 फेब्रवारी) ख्राईस्टचर्च (Christchurch) न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात दुसरा आणि शेवटचा कसोटी (2nd Test Match) सामना सुरु होणार आहे. या सामन्यात भारताच्या 11 जणांच्या संघात बदल केला जाऊ शकतो. याचे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) दिले आहेत.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांपैकी कोणाला संधी मिळेल असा प्रश्न आहे. परंतु शास्त्रींनी जडेजाला संघात संधी देण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यांनी 11 जणांच्या संघाचा निर्णय उद्या सामन्यापूर्वी घेण्यात येईल असे देखील सांगितले.

अश्विनने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 99 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्याला फलंदाजीत अपयश आले होते. तो पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात 4 धावांवर बाद झाला होता.

यावेळी अश्विनबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले की, “चेंडू किती फिरकी घेऊ शकतो, हे तुम्ही परिस्थिती पाहून माहित करून घेता. अश्विन हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. परंतु मला असे वाटते की, त्याची फलंदाजी निराशाजनक होती .”

भारतीय संघासाठी फक्त फलंदाजी हा चिंतेचा विषय नाही. कारण, पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांची खराब कामगिरी देखील चिंतेचा विषय ठरली आहे. त्यांनी योग्य लेंथने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे ते न्यूझीलंडच्या तळातल्या फलंदाजांची विकेट घेण्यातही अपयशी ठरले होते.

2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ ख्राईस्टचर्च येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1ने बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---