चार वेळचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघ 16व्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये आहे. मात्र, गुरुवारी (दि. 27 एप्रिल) चेन्नईला जयपूर येथे राजस्थान रॉयल्स संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना अपयश आले. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला. पराभूत होऊनही सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा विश्वास आहे की, फलंदाजी क्रमात बदल करण्याची गरज नाहीये. कारण, ज्या गोष्टी योग्य सुरू आहेत, त्यांच्याशी छेडछाड करणे योग्य ठरणार नाही.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने 203 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 6 विकेट्स गमावत 170 धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने 32 धावांनी सामना जिंकला. हा चेन्नईचा आयपीएल 2023मधील 8 सामन्यांपैकी तिसरा पराभव आहे.
मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Head Coach Stephen Fleming) यांना विचारण्यात आले की, काही फलंदाज वरच्या फळीत खेळवण्याची गरज आहे का? यावर ते म्हणाले की, “निश्चित करण्यात आलेली भूमिका महत्त्वाची असते. अजिंक्य रहाणे आमच्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खूप चांगली भूमिका पार पाडत आहे. ज्या गोष्टी योग्य सुरू आहेत, त्या गोष्टींमध्ये आम्हाला छेडछाड करण्याची गरज नाहीये.”
Huddle in to hear the coach speak! Here's the Gaffer's take on #RRvCSK 🗣️🎙️#WhistlePodu #Yellove #IPL2023 🦁💛 @SPFleming7
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 28, 2023
सामन्यानंतर माद्यमांशी बोलताना म्हटले की, “आज आमचा सामना एक अशा संघाविरुद्ध होता, ज्याने चेंडूच्या गतीवर नियंत्रण ठेवले. आम्ही पहिल्या सहा षटकात लय मिळवू शकलो नाहीत. डेवॉन कॉनवे शानदार फॉर्ममध्ये आहे, पण तो लय पकडू शकला नाही. आमचा डाव संथ गतीने पुढे गेला आणि जेव्हा आम्ही वेगाने धावा करायचा प्रयत्न केला, तेव्हा काही चुका केल्या.”
फ्लेमिंग यांनी स्वीकारले की, त्याने पॉवरप्लेमध्येच सामना गमावला होता. ते म्हणाले की, विरोधी संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये पहिल्या सहा षटकात चांगले प्रदर्शन केले. ते असेही म्हणाले की, “फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये पहिल्या सहा षटकात त्यांचे प्रदर्शन अतुलनीय होते. यामुळे त्यांनी सामन्यात आपली पकड मजबूत केली. आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू शकत होतो.”
A 32-run win over #CSK propels @rajasthanroyals to the 🔝 of the Points Table 👏 👏@ybj_19 is the Player of the Match for his important knock 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/LoIryJ4ePJ#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/uupcVq82mT
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2023
खरं तर, चेन्नईने राजस्थानविरुद्ध सामना गमावताच गुणतालिकेतील अव्वलस्थान गमावले. चेन्नई संघ आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. तसेच, राजस्थानने पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच, गुजरात टायटन्स 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यांना अद्याप 8वा सामना खेळायचा आहे. चेन्नई सुपर किंग्सबाबत बोलायचं झालं, तर त्यांचा पुढील सामना रविवारी (दि. 30 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडणार आहे. (head coach stephen fleming said no need to change in batting order)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुझ्या लग्नात नाचायला येईल…’, स्वत: KKRच्या मालकाचे रिंकूला प्रॉमिस; व्हिडिओत फलंदाजाचा खुलासा
श्रीलंकेच्या गोलंदाजाचा भीमपराक्रम! 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत कसोटीत रचला इतिहास