विश्वचषक 2023 मधील 27वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड यांच्यात धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी मोडून काढला आहे.
पहिल्या पावरप्ले मध्येच ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी 118 धावा चोपल्या. या सामन्यात आपला पहिला विश्वचषक सामना खेळणारा ट्रेविस हेड (Travis Head) याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकले आहे. त्याने 25 चेंडूत हे अर्धशतक ठोकले आहे. ट्रेविस हेडने विश्वचषक २०२३ मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकणारांच्या यादीत श्रीलंकेचा कर्णधार कुशाल मेंडिस (Kusal Mendis) याची बरोबरी केली आहे. कुशाल मेंडिस याने या विश्वचषकात २५ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक ठोकलं होतं.
विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ पहिले दोन्ही सामने हरला होता त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकले आहेत. नेदरलँडविरूद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी झेप घेतली. आता कांगारूंचे सहा गुण असून आजच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 8 गुण होतील. सेमी फायनलचा विचार केला तर तीन संघांचं गणित उघड होतं, ज्यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे तीन संघ जवळपास निश्चित मानले जात आहेत. आता जी काही चुरस आहे ती चौथ्या स्थानासाठी असल्याचं दिसत आहे.
तर न्यूझीलंड संघाने या विश्वचषकात 5 सामने खेलले आहेत. 5 मधील सलग चार सामने त्यांनी जिंकले होते. मात्र पाचव्या सामन्यात भारताने त्यांचा पराभव करत विजयरथ रोखला होता. भारत हा एकमेव संघ आहे ज्यांनी या विश्वचषकात एकही सामना हरलेला नाही. न्यूझीलंडने आजच्या सामन्यात विजय मिळवला तर ते भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या गुणांशी बरोबरी करतील. (Head dominated his teammate hit the fastest half-century in the World Cup)
म्हत्वाच्या बातम्या