इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत रविवारी (१० ऑक्टोबर) क्वालिफायरची पहिली लढत पार पडणार आहे. या सामन्यात अनुभवी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना करणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहता, या सामन्यात त्यांना विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. यात काही शंका नाही. चला तर पाहूया या संघांमधील मागील काही सामन्यांची आकडेवारी.
या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला थेट आयपीएल २०२१ स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. जो संघ क्वालिफायर २ मध्ये विजयी होईल, त्या संघाचा सामना एलिमिनेटरमध्ये क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या संघासोबत होणार आहे. परंतु दोन्ही संघ याच सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
या हंगामात हे दोन्ही संघ २ वेळेस आमने सामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. या हंगामात पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ १० एप्रिल रोजी आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसरा सामना ४ ऑक्टोबर रोजी पार पडला होता. या सामन्यात देखील दिल्ली कॅपिटल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला होता.
चेन्नई सुपर किंग्सवर दिल्ली कॅपिटल्स पडते भारी
या दोन्ही संघांमधील गेल्या ५ सामन्यातील कामगिरी पाहिली तर, दिल्ली कॅपिटल्स संघाने यापैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघाला अवघ्या १ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर, हे दोन्ही संघ २५ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाला १५ वेळेस विजय मिळवण्यात यश आले आहे. तर १० सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या क्वालिफायरमध्ये गुरू-शिष्य बनणार ‘विक्रमवीर’, धोनी करणार अनोखा विक्रम तर रिषभ रचणार इतिहास
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ‘या’ दोन खेळाडूंचे भवितव्य मेंटॉर धोनीच्या हातात; कोण आहेत ते धुरंधर?
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांचे खराब प्रदर्शन, ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्स राखून विजय