सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांनंतर दोन्ही संंघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. आता तिसरा कसोटी सामना (14 डिसेंबर) पासून सुरू होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ गाबाच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत.
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या या हाय व्होल्टेज कसोटी मालिकेतील पहिला सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. मात्र ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव करत मालिका बरोबरीत आणली.
जागतिक क्रिकेटमधील 2 सर्वोत्तम संघ भारत-ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी युद्ध खूप जुने आहे. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 109 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 46 सामने जिंकले आहेत, तर भारताने 33 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 29 सामने अनिर्णित राहिले आहेत.
ब्रिस्बेनमध्ये (गाबा) भारतीय संघाची कामगिरी- 7 कसोटी सामने, 1 विजय, 5 पराभव, 1 अनिर्णित
सर्वोच्च धावसंख्या- 409 धावा (120.1 षटके)
किमान धावसंख्या- 58 धावा (21.3 षटके), 1947
सर्वात मोठा विजय- 2021च्या बॉर्डर-गावसकर ट्राॅफी स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव केला.
सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या- सौरव गांगुली- 144 धावा (2003)
सर्वाधिक शतके- एम. जयसिंह, सौरव गांगुली आणि मुरली विजय (प्रत्येकी 1 शतक)
सर्वाधिक अर्धशतके- रूसी सुरती, 2 अर्धशतके
सर्वाधिक विकेट्स– इरापल्ली प्रसन्ना- 8 विकेट्स (2 कसोटी सामने)
एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी- इरापल्ली प्रसन्ना 33.4 षटकात 104 धावांत 6 विकेट्स (1968)
महत्वाच्या बातम्या-
शिक्कामोर्तब! चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गतच होणार, भारताचे सामने या देशात खेळले जातील
ट्रॅव्हिस हेड गाबामध्ये भारताविरुद्ध काहीच करू शकणार नाही, आकडेवारी खूपच खराब!
गाबाच्या ऐतिहासिक स्टेडियमवर टीम इंडिया शेवटचा सामना खेळणार, जाणून घ्या कारण




