RCB vs PBKS Qualifier 1: आज (29 मे) IPL 2025 मधील पहिला क्वालिफायर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुल्लानपूरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. (PBKS vs RCB Qualifier 1) विशेष म्हणजे, आज जो जिंकणार तो फायनलमध्ये पोहोचणार. दोन्ही संघांनी यापूर्वी कधीही IPL चे विजेतेपद पटकावले नाही. एका बाजूला पंजाब किंग्ज आहे, जे 2014 नंतर प्रथमच फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने 2016 नंतर फायनलमध्ये धडक मारलेली नाही. चला तर मग आकडेवारीच्या आधारे जाणून घेऊया की हा पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोणाचे पारडे जड आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकूण 35 वेळा सामना झाला आहे. यापैकी 18 वेळा पंजाबने तर 17 वेळा बंगळूरुने विजय मिळवला आहे. तसेच या हंगामात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. मागील 5 सामन्यांचा विचार केल्यास, 4 वेळा आरसीबीने बाजी मारली आहे. मुल्लानपूरच्या मैदानावर या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकच सामना झाला असून, त्यात आरसीबीने बाजी मारली होती. (RCB vs PBKS Head To Head Records)
आरसीबीने आतापर्यंत प्लेऑफमध्ये 15 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 5 वेळा विजय मिळाला असून 10 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाबने आतापर्यंत प्लेऑफमध्ये केवळ 4 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना 3 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. सर्व आकडेवारीनुसार, आरसीबी थेट फायनलमध्ये पोहोचताना दिसत आहे. (Records of both teams in the playoffs)
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि रिकी पॉन्टिंगच्या प्रशिक्षणाखाली पंजाब किंग्जने निर्भय क्रिकेट खेळले आहे. 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला आपल्या नेतृत्वात फायनलमध्ये पोहोचवणारा, 2024 मध्ये केकेआरला 10 वर्षांनंतर विजेतेपद मिळवून देणारा आणि आता पंजाब किंग्जला 11 वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचवणारा खेळाडू श्रेयस अय्यरच आहे. रिकी पॉन्टिंगसोबत त्याची जोडी चांगली जमली आहे. पंजाबला लीग स्टेजमध्ये 14 सामन्यांत फक्त 4 पराभव पत्करावे लागले. (Under Ricky Panting’s guidance, Punjab’s team under the leadership of Shreyas Iyer performed well)
दुसरीकडे, आरसीबीकडे इन-फॉर्म खेळाडूंची फौज आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 13 सामन्यांत 8 अर्धशतकांसह 602 धावा केल्या आहेत. मागील सामन्यात जितेश शर्माने अवघ्या 33 चेंडूत 85 धावांची वादळी खेळी केली आहे. जोश हेजलवुड बंगळूरु संघात परतण्याची शक्यता आहे, ज्याने आतापर्यंत स्पर्धेत 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याशिवाय कृणाल पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी अनुक्रमे 15 आणि 14 विकेट्स घेऊन आरसीबीसाठी ‘सायलेंट हिरो’ची भूमिका बजावली आहे. (RCB team players have done excellently so far)






