आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीत शनिवार रोजी (३० ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ आमने सामने येणार आहेत. गट १ मधील या संघांचा हा सामना टी२० विश्वचषकातील २५ वा सामना असून शारजाहच्या मैदानावर उभय संघ भिडणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांनी आतापर्यंत या हंगामात प्रत्येकी २ सामने खेळले असून त्यातील १ सामना जिंकण्यात या संघांना यश आले आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या लढतीत या संघांपैकी कोणाचे पारडे जड असेल हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असेल.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील मागील ५ टी२० सामन्यांविषयी बोलायचे झाल्यास, याचा निकाल एकतर्फी असल्याचे दिसते. दक्षिण आफ्रिका संघाने गेल्या ५ सामन्यांपैकी पाचही सामन्यात विजय मिळवला आहे.
टी२० क्रिकेटमधील या दोन्ही संघांची एकूण आमने सामने कामगिरी पाहायची झाल्यास, आतापर्यंत उभय संघांमध्ये १६ सामने रंगले आहेत. यातील तब्बल ११ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. तर केवळ ५ सामने जिंकण्यात श्रीलंका संघाला यश आले आहे. अर्थातच एकंदर टी२० क्रिकेटमध्येही दक्षिण आफ्रिकेपुढे श्रीलंकेच्या संघाचे पारडे झुकते राहिल्याचे दिसते.
अगदी टी२० विश्वचषकामध्येही दक्षिण आफ्रिकेच्या संघाचेच श्रीलंकेवर वर्चस्व राहिल्याचे दिसते. या स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३ सामने झाले असून त्यातील २ सामने दक्षिण आफ्रिकेने आणि केवळ १ सामना श्रीलंकेने जिंकला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, सामना २५, सुपर १२ गट १
ठिकाण: शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
तारीख आणि वेळ: ३० ऑक्टोबर, दुपारी ३.३० आणि ३.०० वाजता नाणेफेक
लाईव्ह स्ट्रिमिंग: Star Sports Network आणि Disney+Hotstar
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा (कर्णधार), ऍडम मार्कराम, डेविड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, ऍन्रिट नॉर्किए, तबरेज शम्सी
श्रीलंकेचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
पाथुम निसांका, कुसल परेरा (यष्टीरक्षक), चरित असलांका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दसुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, महेश थिक्षाना
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक सामन्यात ब्रावोच्या हातून घोडचूक, एका चेंडूवर खर्च केल्या चक्क १० धावा; पाहा व्हिडिओ
दुर्दैवचं अजून काय! ना स्ट्राईक मिळाली ना एकही चेंडू खेळला, तरीही रसेल शून्यावर धाबवाद; पाहा कसं?