रविवार, 1 जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने डेन्मार्कला पेनाल्टी शूटआउटमध्ये 3-2 ने पराभूत केले.
अतिशय अटातटीच्या झालेल्या या सामन्यात डेनमार्कच्या मथिआस जॉरगेनसेन सामन्याच्या 58 व्या सेकंदाला गोल करत डेनमार्कला खाते उघडून दिले. तर 1-0 ने पिछाडीवर असलेल्या क्रोएशियाला मारीओ मॅन्डुकिकने 4 थ्या मिनिटाला गोल करत बरोबरीत आणले.
या रंगतदार सामन्यात निर्धारीत वेळेनंतरच्या अतिरीक्त वेळेतही हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
त्यानंतर झालेल्या पेनाल्टी शूटआउटमध्ये क्रोएशियाने डेनमार्कला 3-2 ने पराभूत केले.
फिफा क्रमवारीत 20 व्या स्थानी असलेल्या क्रोएशियाला तब्बल 20 वर्षांनंतर उपांत पूर्व फेरीत स्थान मिळवण्यात यश आले.
यापूर्वी क्रोएशिया 1998 सालच्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहचला होता.
शनिवार, 7 जुलैला क्रोएशिया उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान रशियाला आव्हान देतील.
अशी आहे क्रोएशियाची 2018 फिफा विश्वचषकातील कामगिरी-
गट फेरी: डी गट
क्रोएशिया वि.नायजेरीय 2-0 ने विजयी
क्रोएशिया वि.अर्जेंटीना 3-0 ने विजयी
क्रोएशिया वि.आइसलँड 2-1 ने विजयी
बाद फेरी
क्रोएशिया वि.डेनमार्क 3-2 ने विजयी
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स
-सेरेना विलियम्सचं विम्बल्डनची प्रमुख दावेदार








