फिफा विश्वचषक २०१८ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य फ्रान्सने बेल्जियमचा १-० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
मंगळवारी (१० जुलै) झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सने बेल्जियमचा धुव्वा उडवत १९९८ आणि २००६ नंतर तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.
काल फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी आक्रमक खेळ केला पण पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
दोन्ही संघांना पहिल्या हाफमध्ये गोल करण्याच्या अनेकदा संधी मिळाली मात्र गोल करण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले.
त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सच्या सॅम्युअल उम्टीटीने ५१ व्या मिनिटाला हेडद्वारा अप्रतिम गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर १-० असे पिछाडीवर पडलेल्या बेल्जियमने अत्यंत आक्रमक खेळ केला मात्र फ्रान्सच्या बचावफळी समोर त्यांचा निभाव लागू शकला नाही.
सामना संपताना फ्रान्सने आपली १-० अशी आघाडी कायम ठेवत उपांत्य सामन्यात विजय मिळवला.
आता १५ जुलैला अंतिम सामन्यात फ्रान्सला दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेता संघ इंग्लंड किंवा क्रोएशिया विरुद्ध विश्वविजेतेपदासाठी लढावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशिया लढणार इंग्लंडशी
-फिफा विश्वचषक: ब्राझिल संघाच्या बसवर चाहत्यांचा हल्लाबोल…