---Advertisement---

बॅडमिंटन कोर्टवर अचानक हार्ट अटॅक आला, तरुण खेळाडूचा तडफडून मृत्यू; VIDEO व्हायरल

On: मंगळवार, जुलै 2, 2024 3:30 PM
---Advertisement---

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चीन आणि जपान यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात चीनकडून झांग झिजी खेळत होता, तर जपानकडून काझुमा कावाना कोर्टवर होता. सामन्यादरम्यान चीनचा खेळाडू अचानक कोर्टवर कोसळला आणि यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक यूजर्स यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या खेळाडूला लवकर मदत मिळाली असती तर त्याला वाचवता आलं असतं, असं युजर्स लिहित आहेत.

रविवारी (30 जून) संध्याकाळी उशिरा चीनचा झांग झिजी आणि जपानचा काझुमा कावाना यांच्यात आशिया ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा एकेरी सामना खेळला जात होता. पहिला गेम 11-11 असा बरोबरीत असताना झांग अचानक जमिनीवर पडला. आधी त्याच्यावर कोर्टवरच उपचार करण्यात आले आणि नंतर ॲम्ब्युलन्सनं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु त्याचा जीव वाचवता आला नाही.

“चीनचा खेळाडू झांग झिजी रविवारी संध्याकाळी एका सामन्यादरम्यान कोर्टवर कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे रात्री 11:20 वाजता त्याचा मृत्यू झाला,” असं बॅडमिंटन आशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PBSI) यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. निवेदनात पुढे म्हटलं आहे की, बॅडमिंटन जगतानं एक प्रतिभावान खेळाडू गमावला. पीबीएसआयचे प्रवक्ते ब्रोटो हॅपी यांनी सांगितलं की, वैद्यकीय तपासणीत झांगला हृदयविकाराचा झटका आल्याचं आढळून आलं.

झांग झिजी जेव्हा कोर्टवर कोसळला, तेव्हाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झांग पडल्यानंतर सुमारे 40 सेकंद तो विव्हळत होता. त्याला कोणाचीही मदत मिळत नाही. त्यानंतर डॉक्टर मदतीसाठी धावतात. व्हिडिओमध्ये झांग पडल्यानंतर एक माणूस मदत करण्यासाठी धावताना दिसत आहे, परंतु तो थांबतो आणि पुढील सूचनांसाठी कोर्टबाहेर पाहत असल्याचं दिसतं. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

पीबीएसआयच्या प्रवक्त्यानं नंतर पत्रकारांना सांगितलं की, वैद्यकीय पथकानं एक नियम पाळला पाहिजे, ज्यानुसार त्यांना कोर्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रेफरीची परवानगी आवश्यक आहे. या घटनेनंतर चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर संतापाचं वादळ उठलं असून अनेकांनी या नियमाचा तीव्र निषेध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघानंतर राहुल द्रविड आता आयपीएलमध्ये कोचिंग सांभाळतील? आरसीबीसह या 3 टीम आहेत शर्यतीत
लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था
रोहित शर्मानंतर टी20 मध्ये भारताचा कर्णधार कोण होणार? जय शाह यांचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---