माजी हेवीवेट चॅम्पियन बॉक्सर माईक टायसन सध्या खराब शारिरीक परिस्थितीसोबत झुंज देत आहे. तो सध्या व्हीलचेअरवर आहे. टायसनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली बॉक्सरपैकी एक असलेला टायसन व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे. ही छायाचित्रे अमेरिकेतील मियामी विमानतळाची आहेत. यामध्ये तो व्हीलचेअरवर बसला असून त्याच्या हातात काठीही आहे. ही छायाचित्रे पाहून असा अंदाज बांधणे फारसे अवघड नाही की, जो बॉक्सर रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना आपल्या एका ठोसेने चिरडायचा, त्याची प्रकृती सध्या ठीक नाही आणि त्याला व्हीलचेअरच्या मदतीने चालावे लागते.
विशेष म्हणजे ५६ वर्षीय माइक टायसनची ही स्थिती सतत गांजा (Cannabis) घेण्याने झाल्याचं सांगितले जात आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, माइक टायसन दर महिन्याला गांजावर सुमारे ३२ लाख रुपये खर्च करतो. टायसन त्याच्या ४२० एकर शेतात हा गांजा पिकवतो. त्यासाठी त्यानी कायदेशीर मान्यताही घेतली आहे. याच गांजाच्या नियमित सेवनामुळे आज या जगज्जेत्यावर ही वेळ आली असल्याचे सांगितले जात आहे.
माईक टायसन याने एक महिन्यापूर्वी त्याच्या पॉडकास्टमध्ये मृत्यूबद्दल एक मोठे विधान केले होता. तो म्हणाला होता की, “नक्कीच, आपल्या सर्वांना एक दिवस मरायचे आहे. जेव्हा जेव्हा मी स्वतःला आरशात पाहतो तेव्हा मला माझ्या चेहऱ्यावर छोटे छोटे डाग दिसतात, मग मी स्वतःला सांगतो, कदाचित माझी एक्सपायरी डेट जवळ आली आहे.”
पैसा खोटा आशेचा किरण देतो: टायसन
टायसनने आपल्या पॉडकास्टमध्ये पुढे सांगितले की, “त्याच्यासाठी पैशाचे महत्त्व नाही. मी लोकांना नेहमी सांगतो की त्यांना वाटते की भरपूर पैसे मिळाल्याने ते आनंदी होऊ शकतात. त्याच्याकडे पूर्वी कधीच जास्त पैसे नव्हते. जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो, तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा करू शकत नाही की कोणीही तुमच्यावर प्रेम करेल. पैसा खोटी आशा देतो. तुमचा असा विश्वास आहे की जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो तेव्हा तुम्ही खूप शक्तिशाली बनता, जे खरे नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की पैसा खोटा आशेचा किरण देतो.”
वयाच्या २०व्या वर्षी हेवीवेट चॅम्पियन बनला
माईक टायसन १९८७ मध्ये वयाच्या २०व्या वर्षी इतिहासातील सर्वात तरुण हेवीवेट चॅम्पियन बनला. त्याच्या कारकिर्दीत त्याने नॉकआउटद्वारे ४४ विजयांसह ५० विजय मिळवले. १९९०मध्ये बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ते ३ वर्षे तुरुंगातही होते. असा संपूर्ण रोमांचक आयुष्य असणाऱ्या टायसनने केविन मॅकब्राइड विरुद्धच्या पराभवानंतर २००५मध्ये निवृत्ती जाहीर केली होता. मात्र, नोव्हेंबर २०२० मध्ये रॉय जोन्स (ज्युनियर) विरुद्धच्या प्रदर्शनी लढतीत रिंगमध्ये परतला. हा सामना अनिर्णित राहिला आणि टायसनचे पुनरागमन फोल ठरल्याचे समोर आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत आणि पाकिस्तान WTCच्या अंतिम सामन्यात पोहचले नाही तर…’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे खळबळजनक विधान
VIDEO। मुंबईच्या रस्त्यावर ‘विरुष्काची’ स्कूटर राईड! फॅन्स पासून वाचण्यासाठी वापरली खास आयडिया
डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 474 खेळाडू सहभागी