यंदाच्या कॅरिबियन प्रीमियर लीगला 30 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. चाहते देखील सहा संघांमधील विजेतेपदाची लढाई पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सेंट लुसिया किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने कौटुंबिक कारणांमुळे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. तो या हंगामात आता सहभागी होणार नाही.
सेंट लुसियाने जूनमध्ये क्लासेनवर करार केला होता. फ्रँचायझीने त्याच्या जागी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज टिम सेफर्टचा संघात समावेश केला आहे. सेफर्ट याआधी 2020 मध्ये त्रिनबागो नाइटराइडर्सकडून खेळला होता आणि त्याने ट्रॉफीही जिंकली होती. क्लासेनच्या बाहेर पडल्यामुळे पंजाब किंग्ज फ्रँचायझीचे नुकसान होणार आहे
काैटुंबिक कारणामुळे क्लासेनने नाव मागे घेतल्याने पंजाब किंग्ज फ्रँचायझीचे बरेच नुकसान होऊ शकते. कारण हा फलंदाज दीर्घकाळापासून टी20 फॉरमॅटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाची आयपीएल 2024 मध्ये शानदार लय होती. शिवाय त्याने संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये क्लासेनने 190 धावा केल्या होत्या. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र त्याची खेळी संघाला उपयोगी पडली नाही. संघाचा पराभव झाला.
त्यासोबतच दक्षिण आफ्रिकेचे धोकादायक फलंदाज डेव्हिड मिलर आणि केशव महाराज हे त्यांच्या फ्रँचायझी बार्बाडोस रॉयल्ससाठी पहिल्या दोन सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध नसतील. कारण ते 5 सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मिलरच्या जागी बार्बाडोसने शामराह ब्रूक्सचा संघात समावेश केला आहे.
वास्तविक, सेंट लुसिया संघाला या स्पर्धेत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. फ्रँचायझी दोनदा फायनलमध्ये पोहोचली असली तरी दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी सेंट लुसिया संघ पहिले विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात नक्कीच उतरेल.
हेही वाचा-
“सचिन नंतर मी क्रिकेटचा देव आहे” भारतीय दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य! VIDEO
स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचं ट्विटर अकाऊंट हॅक! रोनाल्डो, मेस्सीवरील वादग्रस्त पोस्ट व्हायरल
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड ताफ्यात नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाची एँट्री