क्र, 6 डिंसेंबर 2022: रॉक 27 यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या महिला टी -20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत हेमंत पाटील रॉयल्स, चंद्रोस व गॅरी कर्स्टन संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
रॉक 27 क्रिकेट अकादमी मैदान, लोणी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत उद्घाटनाच्या सामन्यात गौतमी नाईकच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर हेमंत पाटील रॉयल्स संघाने साईदीप हिरोज् संघाचा 217 धावांनी मोठा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना हेमंत पाटील रॉयल्स संघाने 20 षटकांत 3 बाद 253 धावांचा डोंगर रचला. गौतमीने 43 चेंडूत 13 चौकार व 5 षटकारांसह 106 धावा करत संघाचा डाव भक्कम केला. सोनल पाटीलने अर्धशतक ठोकत गौतमीला सुरेख साथ दिली. गौतमी नाईक सामनावीर ठरली.
अन्य लढतीत तनुजा भोसलेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर चंद्रोस संघाने यजमान रॉक 27 संघाचा 3 गडी राखून पराभव केला, तर मयुरी साळुंखेच्या भोदक गोलंदाजीने गॅरी कर्स्टन संघाला किंग्ज स्पोर्ट्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवून दिला. स्पर्धेचे उद्घाटन अर्चना कामठे (सदस्य जिल्हा परिषद पुणे.), वंदना काळभोर (ग्रामपंचायत सदस्य कदम वाकवस्ती) यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
हेमंत पाटील रॉयल्स: 20 षटकांत 3 बाद 253 धावा (गौतमी नाईक 106(43,13×4,5×6), सोनल पाटील 57(38,7×4), ऋतुजा गिलबिले 25(15,3×4), शिवानी यादव 1-37) वि.वि साईदीप हिरोज्: 13.5 षटकांत सर्वबाद 36 धावा (श्रद्धा गिरमे 8, इशिता खळे 3-3, प्रियांका कुंभार 2-15, रोहिणी माने 1-1) सामनावीर- गौतमी नाईक
हेमंत पाटील रॉयल्स संघाने 217 धावांनी सामना जिंकला.
रॉक 27: 20 षटकांत 8 बाद 73 धावा(भानवी कपले नाबाद 23(40,2×4), प्रियांका सांगवान 2-8, आरती बाहेनवाल 2-11, तनुजा भोसले 2-14) पराभूत वि
चंद्रोस : 16.5 षटकांत 7 बाद 74 धावा(मानसी तिवारी 25(38,5×4), तेजश्री कदम 14(8,3×4), मनाली कुलकर्णी 2-12, जय शिंदे 1-9) सामनावीर- तनुजा भोसले
चंद्रोस संघाने 3 गडी राखून सामना जिंकला.
किंग्ज स्पोर्ट्स: 19 षटकांत सर्वबाद 79 धावा (नेहा गुरव 14(22,2×4), वेलिशा पटेल 13(9,3×4), मयुरी साळुंखे 4-17, चार्मी गवई 2-2, सानिका शिंदे 2-8) पराभूत वि गॅरी कर्स्टन: 10 षटकांत 2 बाद 80 धावा (चार्मी गवई नाबाद 39(23,6×4), आयेशा शेख 26(12,6×4), निकिता भुवा 1-8) सामनावीर- मयुरी साळुंखे
गॅरी कर्स्टन संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.
(Hemant Patil Royals, Chandros, Garry Kirsten’s winning opening in 3rd Women’s T20 Cricket Tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतर दुसऱ्या वनडेत भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता! ‘असा’ असेल संघ
विद्या व्हॅलीच्या विजयात सिद्धार्थचे चार गोल






