इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लिड्स येथे ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत २-० ने आघाडीवर असून न्यूझीलंडला क्लिन स्वीप देण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. तर न्यूझीलंडचा संघ लाज राखण्यासाठी हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्स विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याच्या विकेटची सध्या क्रिकेटजगतात सर्वत्र चर्चा आहे.
हेन्री निकोल्सने (Henry Nicholls) इतक्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली विकेट गमावली की, पाहून इंग्लंडचा गोलंदाज जॅक लिच आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनाही आश्चर्य वाटले. अगदी मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या नियमांना पुन्हा पाहण्याची गरज भासली.
तर झाले असे की, न्यूझीलंडच्या (NZ vs ENG) डावातील ५६ वे षटक टाकण्यासाठी इंग्लंडकडून जॅक लिच आला होता. त्याच्या या षटकातील दुसरा चेंडू हेन्री निकोल्सने सरळ दिशेला मारला, ज्यामुळे चेंडू नॉन स्ट्राईककडील फलंदाज डॅरिल मिचेलकडे आला. यावेळी मिचेलने स्वतला चेंडूपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नकळतपणे चेंडू त्याच्या बॅटला लागून मिड ऑफकडे उडाला. यावेळी मिड ऑफवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या ऍलेक्स लीसने सहज हा चेंडू पकडला आणि इंग्लंडचे खेळाडू विकेटचा जल्लोष साजरा करू लागले.
परंतु स्वत: गोलंदाज जॅक लिचला आपल्याला खरोखरच विकेट मिळालीय की नाही, याबाबत शंका (Henry Nicholls Strangest Dismissal) होती. परंतु पंचांनी निकोल्सला बाद दिल्याने तोही जल्लोष साजरा करण्यात रमला. मात्र अशा विचित्र पद्धतीने गेलेल्या विकेटनंतर क्रिकेटप्रेमी हा नक्की बाद देण्याचा प्रकार आहे का?, याची शोधाशोध करू लागले आहेत.
What on earth!? ????????
Scorecard/clips: https://t.co/AIVHwaRwQv
???????????????????????????? #ENGvNZ ???????? pic.twitter.com/yb41LrnDr9
— England Cricket (@englandcricket) June 23, 2022
काय सांगतो क्रिकेटचा नियम
मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या नियम ३३.२.२.३ नुसार फलंदाजाला अशा पद्धतीने बाद दिले जाऊ शकते. या नियमात असे म्हटले गेले आहे की, जर कोणता चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून पंच, दुसरा क्षेत्ररक्षक, रनर किंवा इतर फलंदाजाला लागल्यानंतर झेल गेला, तर फलंदाजाला बाद दिले जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सराव सामन्यातही वाद, पंचांनी चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्यानंतर संतापला विराट; मैदानातच विचारला जाब
एकाही प्रथम श्रेणीचा अनुभव नसलेल्या गोलंदाजाने उडवल्या रोहित-विराटच्या दांड्या, पण कोण आहे हा भिडू?
ENGvsIND: टीम इंडियासाठी गुड न्यूज, फलंदाजांना चारी मुंड्या चीत करणारा पठ्ठ्या मोठ्या संकटातून मुक्त





