---Advertisement---

एक, दोन नव्हे, तर तब्बल ५ वेळेस हॅट्रिकचा कारनामा, मलिंगाचे ‘हे’ मोठे विक्रम तोडणे अशक्यच

---Advertisement---

श्रीलंका संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने मंगळवारी (१४ सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाजी आणि आपल्या अचूक यॉर्कर चेंडूसाठी प्रसिद्ध असलेल्या लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. तसेच याच वर्षी वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, टी२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी त्याने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली नव्हती. परंतु, टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड न झाल्यामुळे त्याने निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले. यात असेही काही विक्रम आहेत जे कुठल्याही गोलंदाजाला तोडणे सोपे जाणार नाही.

आपल्या आगळ्या वेगळ्या ॲक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या मलिंगाने आपल्या कारकीर्दीत केलेल्या विक्रमांपैकीच एक विक्रम म्हणजे ५ वेळेस हॅट्रिक घेणे. कुठल्याही गोलंदाजासाठी हॅट्रिक घेणे खूप मोठी गोष्ट असते, परंतु हे काम इतके सोपे नसते. काही गोलंदाजांना संपूर्ण कारकिर्दीत असा कारनामा करता येत नाही. परंतु, मलिंगाने हा कारनामा ५ वेळेस केला आहे. यादरम्यान दोन वेळेस त्याने सलग ४-४ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. ५ पैकी वनडे क्रिकेटमध्ये त्याने ३ वेळेस हॅटट्रिक करण्याचा विक्रम केला आहे.

तसेच तो वनडे विश्वचषकात २ वेळा हॅट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याने २००७ आणि २०११ सालच्या विश्वचषकात हॅट्रिक घेतली आहे. मलिंगाने २ वेळा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये हॅट्रिक घेतली आहे. असा कारनामा करणारा तो सध्यातरी एकमेव गोलंदाज आहे.

मलिंगाने गेली अनेक वर्ष आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने या स्पर्धेत एकूण १२२ सामने खेळले, या दरम्यान, त्याने १७० गडी बाद केले. तो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. तसेच १३ धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ८४ सामने खेळले. यादरम्यान त्याला १०७ गडी बाद करण्यात यश आले होते. तर २२६ वनडे सामन्यात त्याने ३३८ आणि ३० कसोटी सामन्यात १०१ गडी बाद केले आहेत. (Here are some outstanding records of lasith Malinga in international cricket)

टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन गतवर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, ही स्पर्धा येत्या १७ ऑक्टोबर पासून युएईमध्ये पार पडणार आहे. मलिंगाने गतवर्षी टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, या स्पर्धेसाठी त्याची संघात निवड झाली नाही. त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या – 

चहल म्हणतोय, ‘मला आरसीबीमधून निवृत्त व्हायचंय आणि माझं स्वप्न असेल की…’

हनुमा विहारीने सोडली आंध्र प्रदेशची साथ, आगामी हंगामात करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व

‘भारतासाठी दोन वेगवेगळे कर्णधार असणे फायद्याचेच’, माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---