सोनिपत, हरियाणा । येथे सध्या भारतीय खेळाडूंचे सराव शिबीर सुरु आहे. ३६ कबड्डीपटुंना या शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. त्यात पुरुषांच्या संघात ३ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
यात पुरुष खेळाडूंमध्ये सचिन शिंगाडे, काशिलिंग आडके आणि रिशांक देवाडिगा यांचा तर महिला खेळाडूंमध्ये पूजा शेलार, सायली जाधव आणि अभिलाषा म्हात्रे यांचा समावेश आहे.
हरयाणा राज्यातील सोनिपत येथे संभाव्य संघाचे सराव शिबीर सुरु आहे. हे शिबीर ३० ऑक्टोबरला सुरु झाले असून १९ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी १२ खेळाडूंचा पुरुष आणि महिला संघ निवडण्यात येईल.
१९ नोव्हेंबर रोजी संघ दिल्लीवरून तेहरानला रवाना होईल तर २६ नोव्हेंबर रोजी दिल्ली शहरात परतेल.
मोठ्या प्रमाणात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या शिबिरात जसवीर सिंग, मनजीत चिल्लर आणि धर्मराज चेरलाथन यांना वगळण्यात आले आहे.
या संघात ७ सेनादलचे, ६ हरियाणाचे तर राजस्थानच्या ५ खेळाडूंच्या समावेश आहे.
ही आहे एशियन कबड्डी चॅम्पिअनशिपसाठीचा संभाव्य खेळाडूंचा संघ
#1 जयदीप (सेनादल)
#2 संतोष (कर्नाटक)
#3 सुरिंदर नाडा (हरियाणा)
#4 सचिन शिंगाडे (महाराष्ट्र)
#5 शिवम ओम (हिमाचल प्रदेश)
#6 थिवांकारण (तामिळनाडू)
#7 अजय कुमार (सेनादल)
#8 अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश)
#9 दीपक हुडा (राजस्थान)
#10के प्रपंजन (तामिळनाडू)
#11 कमल किशोर (राजस्थान)
#12 काशिलिंग आडके (महाराष्ट्र)
#13 मणिंदर सिंग (पंजाब )
#14 मोनू गोयत (सेनादल)
#15 पी मल्लिकार्जुन (तेलंगणा)
#16 पवन कुमार काडियान (हरियाणा)
#17प्रदीप नरवाल (सेनादल)
#18 राहुल चौधरी (उत्तर प्रदेश)
#19 राजेश मोंडल (रेल्वे)
#20 राजूलाल चौधरी (राजस्थान)
#21 रिशांक देवाडिगा (महाराष्ट्र)
#22 रोहित बालियान (उत्तर प्रदेश )
#23 रोहित कुमार(उत्तर प्रदेश)
#24 सचिन (राजस्थान)
#25 विकास कांडोला (साई)
#26 विशाल भारद्वाज (हिमाचल प्रदेश)
#27 वझीर सिंग (हरियाणा)
#28 अमित नागर (दिल्ली)
#29 अमित हुडा (हरियाणा)
#30 मोहित चिल्लर (रेल्वे)
#31 नितीन तोमर (सेनादल)
#32 संदीप नरवाल (हरियाणा)
#33 आशिष सांगवान (हरियाणा)
#34 सुरिंदर नाडा (पंजाब)
#35 सुरजीत (सेनादल)
#36 महेंद्र ढाका (राजस्थान)