---Advertisement---

VIDEO: मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर हार्दिक भलताच खुश, चेहऱ्यावर ओसांडून वाहतोय आनंद

Hardik Pandya
---Advertisement---

मुंबई इंडियन्स संघात परतल्यानंतर हार्दिक पंड्या याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी (26 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्ससह सर्व आयपीएल संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यात हार्दिक गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. पण काहीच तासांमध्ये हार्दिक मुंबईत परतल्याच्या बातम्या समोर आल्या. आता मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर हार्दिकने चाहत्यांसाठी खास संदेश दिला आहे.

रविवारी (26 नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर (IPL) लीग म्हणजेच आयपीएल 2024 हंगामसाठी सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार, असा चर्चा काही दिवसांपासून होत्या. पण प्रत्येक्षात यादी समोर आल्यानंतर असे काही होताना दिसले नाही. मात्र, रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी घोषित झाल्यानंतर काही तासांमध्ये हार्दिक पंड्या आघामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार, अशा बातम्या येऊ लागल्या. सोमवारी (27) याबाबत अधिकृत घोषणा देखील झाली.

हार्दिकने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून देखील याबाबत पोस्ट केली होती. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओत हार्दिकने खास प्रतिक्रिया दिली. हार्दिक म्हणत आहे, “मी माझ्या घरी परतलो आहे. याच संघासोबत माझा क्रिकेटचा प्रवास आणि सर्व गोष्टी सुरू झाल्या होत्या. माझ्यासाठी हे खूप भावनिक आहे. माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा टप्पा आहे.”

दरम्यान, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या आयपीएल विजेत्या संघाचा बाग राहिला आहे. पण 2022 हंगामापूर्वी फ्रँचायझीकडून त्याला रिलीज केले गेले होते. गुजरात टायटन्सने संधी साथ हार्दिकला लावातून खरेदी केले आणि कर्णधार बनवले. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात गुजरात टायन्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी हार्दिकची भूमिका महत्वाची राहिली. आयपीएल 2023 मध्येही हार्दिकच्याच नेतृत्वात गुजरात संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. पण सीएसकेकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

हार्दिकच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 123 सामन्यांमध्ये 2309 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 145.86 राहिला, तर सरासरी 30.38 धावांची राहिली. अष्टपैलूने 8.8च्या इकॉनॉमीने आणि 33.26च्या सरासरीने 53 विकेट्सही घेतल्या आहेत. आगामी हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेलताना हार्दिकचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. तसेच मुंबईचे कर्णधारपद रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याकडे सोपवले जाणार, अशाही चर्चा सध्या सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये याबाबत स्पष्टता येऊ शकते. (Here’s what Hardik Pandya had to say, happy after returning to Mumbai Indians)

महत्वाच्या बातम्या – 
बीड क्रिकेटची शान वाढवणारा सचिन! युएईमध्ये खेळणार टीम इंडियासाठी U19 आशिया कप
अखेर हेजलवूडला संघातून वगळण्याचं कारण समजलं! आरसीबीच्या धाडसी निर्णयामागे आहे ‘हे’ कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---