कोलकाता, ३ नोव्हेंबर : हिरो इंडियन सुपर लीग ( आयएसएल) २०२२-२३ मध्ये ईस्ट बंगाल एफसी आणि चेन्नईयन एफसी यांना आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे. मागील आठवड्यात झालेल्या कोलकाता डर्बीत ईस्ट बंगालला विजय मिळवता आला नाही आणि आता त्यांना घरच्या मैदानावर चेन्नईयन एफसीचा सामना करायचा आहे.(Current Standings)
ईस्ट बंगालने मागील सामन्यात एटीके मोहन बागानविरुद्ध पराभव स्वीकारला, परंतु त्यांनी प्रतिस्पर्धींना कडवी टक्कर देताना वर्चस्व गाजवू दिले नाही. मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन आपल्या संघासाठी सर्वात मजबूत इलेव्हन शोधण्याच्या प्रयत्नात हंगामाच्या सुरुवातीपासून फॉरमेशन आणि रणनीतींमध्ये बदल करत आहेत. क्लेईटन सिल्वाला ईस्ट बंगालकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा संयुक्त मान पटकावण्यासाठी दोन गोलची गरज आहे. ईस्ट बंगालसाठी बचावात इव्हान गोंझालेज व लालचुंगनुंगा यांची कामगिरी दमदार झालेली आहे. त्यामुळे या तिघांना विश्रांती देण्याची शक्यता कमी आहे.
चेन्नईयन एफसी आणि ईस्ट बंगाल एफसी यांच्यात आतापर्यंत झालेल्या चारही लढती अनिर्णित राहिल्या आहेत आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी चार गोल केले आहेत. दोन्ही संघांचा बचाव हा उल्लेखनीय झालेला आहे आणि यंदाच्या पर्वात क्लिन शीट राहिलेल्या चार संघांमध्ये या दोघांचा समावेश आहे.
“जर आम्ही खराब खेळत असू आणि डर्बीमध्ये वर्चस्व मिळवले नसते, तर मला काळजी वाटली असती. पण हिरो आयएसएलमधील एकाही सर्वोत्तम संघाने आमच्यावर वर्चस्व मिळवले नाही. केवळ सहा आठवड्यांपूर्वी तयार झालेला संघ जेव्हा अशा संघावर वर्चस्व गाजवतो, तेव्हा मला वाटते की ते खूप सकारात्मक पाऊल आहे. आम्ही उर्वरित सामन्यांत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून तीन गुण मिळवण्यात यशस्वी होऊ, अशी आशा आहे,”असे कॉन्स्टंटाइन म्हणाले. ते पुढे म्हणाले,”कोलकाता येथे येऊन एटीके मोहन बागानला हरवणारा संघ आदरास पात्र आहे.”
चेन्नईयन एफसी बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. हिरो आयएसएलमधील हा त्यांचा चौथा सामना आहे आणि या मैदानावरील दुसरा सामना आहे. मॅच विक १ मध्ये सॉल्ट लेक स्टेडियममध्ये ते खेळले होते आणि त्यांनी यजमान एटीके मोहन बागानला २-१ असे नमवले होते. पण, त्यानंतर त्यांना पुढील दोन सामन्यांत दोनच गुण मिळवता आले. मुख्य प्रशिक्षक थॉमस ब्रडारिक या हंगामात आतापर्यंत पारंपारिक ४-४-२ फॉरमेशनमध्ये अडकले आहेत. शेवटच्या गेममध्ये सुरुवातीच्या क्रमवारीत झालेला एकमेव बदल हा एक जबरदस्त होता, जेव्हा देवांश दाबासने निलंबित देबजित मजुमदारच्या जागी येऊन गोल केला होता. (Club Statistics)
मजुमदारने त्याचे निलंबन पूर्ण केले आहे आणि ईस्ट बंगालविरुद्ध तो परतण्याची अपेक्षा आहे. चेन्नईयन एफसीने यंदाच्या पर्वात तीन गोल केले आहेत. पण, या तीन सामन्यांत त्यांनी गोल करण्याच्या ३५ संधी निर्माण केल्या, प्रत्येक सामन्यात संधी निर्माण करण्याची सरासरी ११.६७ इतकी आहे. “फुटबॉल खूप सोपा खेळ आहे. जर तुम्ही गोल करू शकत नसाल तर तुम्ही जिंकू शकत नाही. शेवटच्या सामन्यात, आम्ही अनेक चांगल्या संधी निर्माण केल्या, परंतु सोपा गोल स्वीकारला. आम्ही सामन्यानंतर त्या पैलूचे विश्लेषण केले. आमच्या पुढच्या सामन्यात सुधारणा करायची आहे, ”असे ब्रडारिक म्हणाले.(Club Statistics)
ते ईस्ट बंगालबद्दल म्हणाले, “ईस्ट बंगाल एक तुल्यबळ संघ आहे आणि हा भारतातील मोठा क्लब आहे. या संघाविरुद्ध खेळणे हे आव्हानात्मक आहे. आम्ही त्यांच्याविरोधात संपूर्ण ताकदीने खेळ करण्याचा प्रयत्न करू. उद्याच्या सामन्यासाठी आम्ही तयार आहोत.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20WC2022 | पाकिस्तानी पठ्ठ्याने मारला सर्वात लांब षटकार, पहिल्या 10मध्ये नाहीये एकही भारतीय
जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांत कदमची उपांत्यपूर्व फेरीत धडक






