भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पाने आता आणखी एक विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध २०१५मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
यावेळी उथप्पा म्हणाला की, तो टी२० क्रिकेटमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना उथप्पा (Robin Uthappa) म्हणाला की, “मला आता प्रतिस्पर्धी बनायचे आहे. मला चांगली कामगिरी करायची आहे. मला विश्वास आहे की माझ्याकडे एक विश्वचषक शिल्लक आहे. त्यामुळे मी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे टी२० सारख्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळण्यावर भर देत आहे.”
“मी जेव्हा २००७-०८ या दरम्यान भारतीय संघाकडून खेळत होतो, तेव्हा मी ज्या काही धावा केल्या. त्या सलामीला फलंदाजी करूनच केल्या. यानंतर पुनरागमन करत मला मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी सांगितले. हे काही योग्य नव्हते,” असेही उथप्पा पुढे म्हणाला.
यावेळी तो म्हणाला की, त्याला आताही असे वाटते की, गोष्टी त्याच्या बाजूने जाऊ शकतात. तसेच तो टी२० विश्वचषक (T20 World Cup) विजेत्या भारतीय संघाचा एक भाग होऊ शकतो आणि त्याचबरोबर तो यावेळी महत्त्वाची भूमिकाही बजावू शकतो.
त्याने भारतीय संघाकडून खेळताना आतापर्यंत ४६ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २५.९४च्या सरासरीने ९३४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २४.९० च्या सरासरीने २४९ धावा केल्या आहेत.
तसेच त्याने २००७मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक आणि त्याचवर्षी आयोजित केलेल्या पहिल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
त्याला २००८मध्ये भारतीय संघातून बाहेर करण्यात आले होते. तसेच ऑक्टोबर २०११मध्ये पुनरागमन केल्यानंतर तो केवळ ८ वनडे आणि ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला होता.
आयपीएलच्या सुरुवातीला त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bengalore) आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून चांगली फलंदाजी केली आहे. परंतु मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) ३ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात
-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले
-कसोटी, वनडे व टी२० प्रकारात ५०पेक्षा जास्त सरासरी असलेले खेळाडू