---Advertisement---

‘तर भारतात एन्ट्री देणार नाही, बीसीसीयकडून मिळाली धमकी’, हर्षल गिब्सचा गंभीर आरोप

On: शनिवार, जुलै 31, 2021 4:00 PM
---Advertisement---

काश्मीर प्रीमियर लीग आणि बीसीसीआय याबाबत वाद सुरू आहेत. त्यामध्ये सहभागी होऊ इच्छित असलेल्या अनेक क्रिकेट दिग्गजांचे म्हणणे आहे की, ‘त्यांना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून कोणताही परदेशी खेळाडू सहभागी होऊ नये,’ असा इशारा मिळाला आहे. याचे मुख्य कारण पाकिस्तानशी असलेले राजकीय वाद आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज हर्षल गिब्स यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथ यांच्याद्वारे त्यांना काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी न होण्याचा संदेश पाठवला आहे.

यापूर्वी, माजी आफ्रिकन फलंदाज गिब्सने ट्विट करत लिहिले होते की, “बीसीसीआय मला पाकिस्तानसोबतच्या राजकीय वादामुळे केपीएलमध्ये खेळण्यापासून रोखत आहे. मला अशी धमकी देखील दिली की, मी या लीगमध्ये भाग घेतला तर, मला भारतात क्रिकेटशी संबधित कुठल्याच कामामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.”

फलंदाज हर्षल गिब्सच्या पूर्वी पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफ यांनी देखील बीसीसीआयवर असे आरोप केले होते. त्या आरोपांमध्ये ते म्हटले होते की, “बीसीसीआय इतर खेळाडूंना इशारा देत आहे की, या लीगमध्ये कोणीही सहभागी होवू नये.”

दरम्यान, काश्मीर प्रीमियर लीग आणि बीसीसीआय या संदर्भात वाद सुरू असून, त्यामध्ये अनेक खेळाडू सहभागी होऊ इच्छितात. सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार तिलकरत्ने दिलशान, मॅट प्रायर आणि मॉन्टी पानेसर यांसारखे खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

नवीन जबाबदारी! ८० च्या दशकात २४७ विकेट्स घेणारा भारतीय दिग्गज बनलाय ‘या’ संघाचा मुख्य प्रशिक्षक

श्रीलंका दौऱ्यातील खराब कामगिरीचा ‘या’ ३ खेळाडूंना बसणार फटका? भारतीय संघातून मिळू शकतो डच्चू

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कोण करणार रोहितसोबत सलामीला फलंदाजी? ‘हे’ आहेत तीन पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---