दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंत कुठल्याही वनडे व टी२० च्या विश्वचषकावर आपले नाव कोरलेले नाही. यावर आता दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज हर्शल गिब्सने मोठा खुलासा केला आहे. यासोबतच त्याने यामागील मोठे कारणही सांगितले आहे.
भारतीय वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना हर्षल गिब्सने येत्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संधीबाबत चर्चा केली. बरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू असूनही आफ्रिका संघ अजूनही कुठल्याही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपले स्थान मिळवू शकलेला नाही. या संघाने १९९८ मध्ये आयसीसी नाॅकआऊट ट्राॅफी व काॅमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. याव्यतिरिक्त त्यांच्या नावावर कुठलाही मोठा विजय नाही.
दबावामुळे दक्षिण आफ्रिका संघ जातो कोलमडून- हर्षल गिब्स
हर्षल गिब्सच्या म्हणण्यानुसार दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा उत्साह व भावना अचल असतात व त्यांचा निश्चयदेखील अढळ असतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू असूनही मोठ्या खेळांमध्ये त्यांना उत्तम कामगिरी करता आलेली नाही.
विश्वचषक न जिंकण्याचे कारण सांगताना तो म्हणाला, ”दक्षिण आफ्रिकेने नेहमीच जागतिक दर्जाचे खेळाडू जागतिक क्रिकेटला दिले आहेत. परंतु अनेक वर्षांमध्ये संघामध्ये एकच दोष दिसतोय तो म्हणजे मोठ्या खेळांमध्ये आणि दबावात चांगल्या खेळीची कमतरता. संघ दबावाखाली विखुरला जातो आणि जोपर्यंत यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत बदल होण्याची शक्यता कमी आहे.”
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०११ विश्वचषक विजेता भारतीय संघाला साखळी सामन्यांमध्ये मात दिली होती. पण उपांत्यपूर्व सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१५ च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकेला पराभूत करून त्यांची वाटचाल उपांत्य सामन्यापर्यंत येऊन पोहोचली होती. पण पुन्हा एका रोमांचक सामन्यात त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. २०१९ चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेसाठी बऱ्यापैकी वाईट ठरला. त्यांना दुसऱ्या फेरीतही पोहचता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”
आश्चर्यकारक! वॉर्नर कधीच नाही खेळणार बीबीएल? मांडली आपली समस्या
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! एकाच दिवशी ६ संघ खेळणार क्रिकेट, रंगणार ३ आंतरराष्ट्रीय सामने