आयपीएल्या दुसऱ्या टप्प्यात २६ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना पार पडला होता. यामध्ये आरसीबीने मुंबईवर ५४ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने सलग ३ विकेट्स घेत आयपीएलच्या चालू हंगामातील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. हॅट्रिक पूर्ण केल्यानंतर हर्षल आनंदात मैदानात धाव सुटला होता आणि त्याच्या मागे कर्णधार विराट कोहलीही धावला होता. यावेळी हर्षलकडून विराटला दुखापत झाली होती, याचा खुलासा स्वत: हर्षलनेच केला आहे.
हर्षलने या सामन्यात कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि राहुल चाहर यांचे विकेट्स घेऊन त्याची हॅट्रिक पूर्ण केली होती. या सामन्यात मुंबई इंडियन्स आरसीबीने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १११ धावांवर सर्वबाद झाला होता. हर्षलने जेव्हा हॅट्रिक पूर्ण केली तेव्हा कर्णधार विराट आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज त्याच्या जवळ होते. आनंद व्यक्त करताना या दोघांना हलकीशी दुखापत झाली होती.
हर्षलने सांगितले आहे की, त्याच्या हॅट्रिकनंतर जल्लोष साजरा करताना काही खेळाडूंना नुकसान पोहचले होते. मोहम्मद सिराजचा पाय ठीक आहे का? हे विचारल्यानंतर हर्षलने हसत उत्तर दिले की, “होय, सिराजचा पाय ठीक आहे. जल्लोष पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी मी त्याला हेच विचारले होते. चांगली गोष्ट आहे की, तो ठीक आहे. हॅट्रिकच्या जल्लोषादरम्यान विराटच्या मांडीलाही खरचटले होते. म्हणून माझ्याकडून काही नुकसान जरूर झाले.”
परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेतल्यामुळे यशस्वी झाल्याचे हर्षलने सांगितले आहे. तो म्हणाला, “परिस्थितीशी जुळवून घेणे, नेहमीच माझ्या खेळाचा भाग राहिले आहे. मी खूप चांगल्या प्रकारे विविध परिस्थितींमध्ये स्वत:ला जुळवून घेतले आहे. ही अशी गोष्ट आहे, ज्यावर मला गर्व आहे. माझी मानसिकता बदलली नाही. माझे विचार बदलले नाहीत. परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घेण्यासाठी मी मानसिक रूपाने स्वत:ला तयार केले. मला बऱ्यापैकी माहित आहे की, मला अशाप्रकारची गोलंदाजी करायची आहे.”
हर्षलने आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत २६ विकेट्स मिळवल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मॉरिसचा खणखणीत शॉट आणि बंदुकीच्या गोळीच्या वेगाने कोहलीने अडवला चेंडू; फलंदाजही म्हणे, काय होतं हे?
चौकार वा षटकार होता निश्चित, इतक्यात मुस्तफिजुरने सीमारेषेवर अडवला चेंडू अन् बनला ‘सुपरहिरो’
मॅक्सवेल पॅड घालून फलंदाजीसाठी होता तयार; मग चहलने केलं असं काही की, कॅमेरामनही खदखदून हसला!