---Advertisement---

सीपीएलमध्ये शिमरोन हेटमायरचे वादळ; सलग दुसऱ्यांदा तुफानी अर्धशतक ठोकत संघाला मिळवून दिला विजयी

On: शुक्रवार, ऑगस्ट 21, 2020 8:54 PM
---Advertisement---

मुंबई । कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये, गयाना अमेझॉन वॉरियर्सने हीरो सेंट किट्स अॅन्ड नेव्हिस पॅट्रियट्स संघाला तीन विकेट्सने नमवून पहिला विजय नोंदविला. केमो पॉलने 4 बळी आणि शिमरोन हेटमेयरच्या 44 चेंडूत 71 धावांच्या जोरावर हा विजय मिळवला. गयानाच्या विजयात हेटमायर पुन्हा एकदा नायक ठरला.

वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पॅट्रियट्सनी 83 धावांत पाच विकेट गमावल्या. परंतु बेन डंक (29) आणि कर्णधार रियाद इम्रीट (17) यांनी अखेरच्या काळात आक्रमक खेळी करत संघाला आठ बाद 127 धावांवर नेले. तथापि, हेटमीयरच्या तडाखेबाज खेळीच्या मदतीने गयानाने हे आव्हान सात गडी गमावून सहज पार केले.

वॉरियर्सकडून हेटमीयरने एक शानदार खेळी केली. त्याने  44 चेंडूत 71 धावा केल्या. हेटमीयरने आपल्या खेळीत 3 षटकार आणि 8 चौकार लगावले. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 161.36 होता. सलग दोन सामन्यात दोन अर्धशतके झळकाविल्यामुळे आयपीएलमधील गोलंदाजांना त्याच्यापासून मोठा धोका होणार असल्याचे त्याने दाखवून दिले.

सीपीएल 2020 च्या पहिल्या सामन्यातही हेटमायरने अर्धशतक झळकावले. त्याने त्याच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली होती. 143.18 च्या स्ट्राइक रेटने खेळत 44 चेंडूत नाबाद 63 धावा काढल्या. या खेळीदरम्यान त्याने  2 चौकार व 2 षटकार ठोकले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---