मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताच्या या विजयात एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.
त्यामुळे वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करतानाची त्याची सरासरी ही 103.07 अशी झाली आहे. याचमुळे तो वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये (कमीतकमी 25 डाव खेळलेल्या) अव्वल क्रमांकावर आला आहे.
त्याच्या पाठोपाठ या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली असून वनडेत धावांचा पाठलाग करताना त्याची सर्वाधिक सरासरी ही 97.98 अशी आहे.
धोनीने आज या सामन्यात 114 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. त्याचबरोबर त्याला केदारने 57 चेंडूत 61 नाबाद धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद 121 धावांची भागीदारी रचली.
तसेच धोनीने त्याआधी तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीबरोबर 54 धावांची भागीदारी केली होती. विराटने या सामन्यात 62 चेंडूत 46 धावांची छोटेखानी खेळी केली आहे.
वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणारे क्रिकेटपटू (कमीतकमी 25 डाव खेळले क्रिकेटपटू)-
103.07 – एमएस धोनी
97.98 – विराट कोहली
86.25 – मायकल बेवन
82.77 – एबी डिविलियर्स
77.80 – जो रुट
महत्त्वाच्या बातम्या-
–असा पराक्रम करणारा धोनी भारताचा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू
–एमएस धोनीच्या शानदार खेळीने रिकी पॉंटींगचाही विक्रम मोडीत
–टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले