पुणे | शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून अंबाती रायडू (३२), एमएस धोनी (नाबाद ३१) आणि सुरेश रैना (२५) यांनी चांगल्या खेळी केल्या.
आयपीएल २०१८मध्ये भारताचा माजी कर्णधार धोनीही सर्वोत्तम फाॅर्ममधून जात आहे. सगळ्याच आघाड्यावर धोनीने छाप सोडली आहे.
१० सामन्यात ६ वेळा नाबाद रहात त्याने ३६० धावा केल्या आहेत. त्यात तब्बल २७ षटकार आणि १९ चौकारांचा समावेश आहे.
Read- ही आहे आयपीएल २०१८मधील सर्वात गमतीशिर आकडेवारी!
धोनीने जमावलेल्या चांगल्या धावा आणि ६ वेळा नाबाद रहाण्यामुळे धोनीला आयपीएलच्या फलंदाजीच्या सरासरीमध्ये चांगलाच फायदा झालेला दिसतोय.
आयपीएल २०१८ सुरू होण्यापुर्वी त्याची सरासरी ३७.८८ होती. परंतु या आयपीएलमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे ती आता ४०.०१ झाली आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये ही सरासरी सर्वोत्तम आहे. भारतीयांमध्ये सर्वोत्तम सरासरीत विराट कोहली (३८.२०) तर सचिन तेंडूलकर (३४.८३) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
Read- धोनी-रोहित शर्माला युसुफ पठाण पडला भारी