न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) खेळला गेला. हा सामना ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळला गेला. फलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतरही गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळे भारतीय संघाला या पहिल्या सामन्यात सात गडी राखून पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडचा उपकर्णधार टॉम लॅथमने नाबाद शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध कोणत्याही यष्टीरक्षकाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आपल्या नावे केली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने या सामन्यात 306 धावा धावफलकावर लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी 100 धावांच्या आत आपले तीन गडी गमावलेले. मात्र, त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन व उपकर्णधार टॉम लॅथम यांनी डावाचे सूत्रे हाती घेत भारतीय गोलंदाजांना एकही यश मिळू दिले नाही. लॅथमने 104 चेंडूवर नाबाद 145 तर केनने नाबाद 94 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने सामना 17 चेंडू राखून आपल्या नावे केला. यासोबतच त्यांनी मालिकेत आघाडी देखील घेतली.
नाबाद शतक झळकावताना टॉम लॅथमने भारतीय संघाविरुद्ध वनडेत एक खास कामगिरी आपल्या नावे केली. त्याने बरोबर 20 वर्षांपूर्वी झिम्बाब्वेच्या यष्टीरक्षक ऍंडी फ्लॉवर यांनी भारतीय संघाविरुद्ध वनडेत एका यष्टीरक्षकाच्या वतीने साकारलेल्या सर्वोच्च 145 धावांच्या खेळीची बरोबरी केली. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने 2005 मध्ये 138 धावांची खेळी साकारली होती. तर, 2015 वनडे विश्वचषकात झिम्बाब्वेचाच ब्रेंडन टेलर हा देखील 138 धावा करण्यात यशस्वी ठरलेला. आता लॅथमने सर्वात वेगाने या धावा केल्याने तो या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
(Highest ODI Score against India as Wicketkeeper 145 Tom Latham 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत धवन-गिल जोडी सुपरहिट! आकडेवारी पाहून तुम्हालाही येईल चक्कर
किवींच्या भूमीवर श्रेयस अय्यरची ऐतिहासिक खेळी! फिफ्टी करताच धोनीला टाकले मागे






