विशाखापट्टनम। भारत विरुद्ध विंडीज संघात आज (24 आॅक्टोबर) दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने 72 तासांच्या आतच उपकर्णधार रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडला आहे.
विराटने या सामन्यात 129 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकार मारताना नाबाद 157 धावांची खेळी केली. त्यामुळे तो वनडेत विंडीज विरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
हा विक्रम करताना त्याने रोहित शर्माच्या नाबाद 152 धावांच्या खेळीला मागे टाकले आहे. रोहितने ही नाबाद 152 धावांची खेळी 21 आॅक्टोबरला झालेल्या पहिल्य़ा वनडे सामन्यात केली होती. त्यामुळे रोहितची ही खेळी तिसऱ्य़ा क्रमांकावर आली आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे. त्याने विंडीज विरुद्ध 219 धावांची खेळी केली आहे. ही त्याची वनडेतीलही सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.
विंडीज विरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे भारतीय फलंदाज –
219 धावा – विरेंद्र सेहवाग
157* धावा – विराट कोहली
152 धावा – रोहित शर्मा
141 धावा – सचिन तेंडुलकर
140 धावा विराट कोहली.
महत्त्वाच्या बातम्या:
–कर्णधार म्हणून विराटची केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी
–विराट कोहली कर्णधार म्हणूनही ठरला हीट; कधीही विचार केला नाही असा विक्रम आता खिशात
–१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम