ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या मोहिमेला शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्याने सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत तब्बल ३७४ धावांचा डोंगर उभा केला.
भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत कुठल्याही संघाने उभारलेली ही तिसर्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. ह्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने २०१५ साली मुंबईत रचलेली ४३८/५ ही धावसंख्या भारताविरुद्ध कोणत्याही संघाने रचलेली वनडे सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर श्रीलंकन संघाने २००९ साली राजकोट येथील सामन्यांत केलेला ४११/८ हा स्कोर, ह्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे.
वनडे सामन्यांतील भारताविरुद्धच्या सर्वाधिक धावसंख्या
१) ४३८/४ दक्षिण आफ्रिका (मुंबई, २०१५)
२) ४११/८ श्रीलंका (राजकोट, २००९)
३) ३७४/६ ऑस्ट्रेलिया (सिडनी,२०२०) *
४) ३६६/८ इंग्लंड (कटक,२०१७)
फिंच-स्मिथची दमदार शतके
फलंदाजांना साथ देणार्या सिडनी क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच आणि मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथ ह्यांनी शानदार शतक झळकावले. त्याच्याच मदतीने कांगारूंनी भारताला ३७५ धावांचे तगडे आव्हान दिले. ही धावसंख्या उभारण्यात भारतीय खेळाडूंच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचीही मदत झाली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ बळी मिळविले, तर बुमराह, सैनी आणि चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत आर्मी’ पोहचली सिडनीत, पाहा व्हिडिओ
लंका प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात कोलंबो किंग्जचा कॅंडी टस्कर्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय
‘हा’ भारतीय वनडेतील सर्वात महान खेळाडू, ऍराॅन फिंचने थोपटली पाठ