पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात आशिया चषक 2023चा पहिला सामना बुधवारी (30 ऑगस्ट) खेळला गेला. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार बाबर आणिज आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने 300 पेक्षा मोठी धावसंख्या केली. यादरम्यान बाबर आणि इफ्तिखार यांनी भारतीय दिग्गज विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांचा खास विक्रम देखील मोडीत काढला.
आशिया चषक 2023 मध्ये एकून 13 सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी 9 सामने श्रीलंकेत, तर 4 सामने यजमान पाकिस्तानमध्ये होणार आहेत. मालिकेचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नवख्या नेपाळ संघात खेळला गेला. नेपाळसाठी हा आशिया चषकातील पदार्पण सामना देखील होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 342 धावा केल्या. बाबर आझम (Babar Azam) याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली, तर इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याने अवघ्या 71 चेंडूत 109 धावा कुटल्या. या दोघांमध्ये 131 चेंडूत 214 धावांची अप्रतिम भागीदारी चाहत्यांना पाहायला मिळाली. वनडे आशिया चषकाच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. तसेच विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या विक्रमाला धक्काही बसला आहे.
वनडे प्रकारातील आशिया चषकात सर्वोत्तम भागीदारी महोम्मद हाफिज आणि नासीर जमशेद यांच्यात 2012 साली झालेल्या आशिया चषकात झाली होती. यादीत दुसऱ्या क्रमांकावर देखील पाकिस्तानचेच शोएब मलिक आणि युनिस खान आहेत. या दोघांनी 2004 आशिया चषकात 223 धावांची भागीदारी केली होती. आता तिसऱ्या क्रमांकावर बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद या जोडीचे नाव आले आहेत. या दोघांमध्ये बुधवारी 214 धावांची भागीदारी झाली. पूर्वी तिसरा क्रमांका विराट आणि रहाणेचा होता, ज्यांनी 2014 आशिया चषकात 213 धावांची भागीदारी केली होती. आता विराट-रहाणेची जोडी यादीत चौख्या क्रमांकावर घसरली आहे. पाचव्या क्रमांकावर देखील भारताचे शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत, ज्यांना 2018 आशिया चषकात 210 धावांची खेळी केली होती. (Highest Partnership in ODI Asia Cup )
वनडे आशिया चषकातील सर्वोत्तम भागीदारी –
224 – मोहम्मद हाफिज, नासीर जमशेद (पाकिस्तान, 2012)
223 – शोएब मलिक आणि युनिस खान (पाकिस्तान, 2004)
214 – बाबर आझम, इफ्तिखार अहमद (पाकिस्तान, 2023)
213 – विराट कोहली, अजिंक्य रहाणे (भारत, 2014)
210 – शिखर धवन, रोहित शर्मा (भारत, 2018)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! बाबर आझमकडून आशिया चषकाची वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी