इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंडच्या महिला संघाला इंग्लंडच्या पुरुष संघाइतकीच फी मिळेल. यापूर्वी, इंग्लंड महिला क्रिकेट संघाला इंग्लंडच्या पुरुष संघापेक्षा कमी फी मिळत होती, परंतु आता दोन्ही संघांना समान पैसे मिळतील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. पुरूष क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघाला समान रक्कम मिळावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ती आता पूर्ण झाली आहे.
इसीबी हे एकमेव बोर्ड नाही ज्याने पुरुष क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघाला समान फी देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने नुकताच हा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांना समान फी मिळते. याशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही हे पाऊल उचलले आहे. महिला क्रिकेट संघाच्या विकासाच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
बीसीसीआय व्यतिरिक्त 3 देशांच्या क्रिकेट बोर्डांनी त्यांच्या पुरुष आणि महिला खेळाडूंना समान फी देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड यांचे या यादीत समावेश आहे. उल्लेखनीय आहे की, अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली होती. ज्या अंतर्गत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला समान रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना जास्त पैसे मिळत असत. पण आता दोन्ही संघान समान पैसे मिळतात.
दरम्यान, आशिया चषक 2023 ला सुरवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध नेपाळ असा होणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध 2 ऑक्टोंबरला आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी चांगलेच सज्ज झालेले दिसत आहे. (england women cricket team will now receive equal match fees as mens team)
महत्वाच्या बातम्या-
विराटला आऊट करण्यासाठी ‘हे’ करा, दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाने सांगितला उपाय
भारतीय संघ आशिया कपसाठी श्रीलंकेला रवाना, तिलक-जडेजाने केले फोटो शेअर